जगभरातून भीक मागणाऱ्या सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या पाकिस्तानला त्याचे जवळचे असणारे मुस्लिम देश सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी खूप मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही देशांनी पाकिस्तान सरकारला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपवण्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. इतकेच नाही तर सौदी अरेबिया आणि यूएईने शाहबाज सरकारला काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरून पाकिस्तानने केलेल्या गदारोळावर शांत राहण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या या आक्षेपांना बगल देत यूएई देश काश्मीरमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनचे पत्रकार कामरान युसूफ यांनी दिलेल्या माहिती नुसार, पाकिस्तान आतापर्यंत काश्मीरवरून इस्लामिक देशांच्या संघटनेत ओआयसी मध्ये गोंधळ घालत आहे. सौदी अरेबिया हा ओआयसी मध्ये सर्वात प्रभावशाली देश आहे आणि त्याचे नेतृत्व सध्या करत आहेत. ओआयसी सौदी अरेबियाच्या इशाऱ्यावर चालते. आता सौदी अरेबियाने स्पष्टपणेच सांगितले आहे की ओआयसी काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा देणार नसून पाकिस्तान आतापर्यंत जगातील प्रत्येक मंचावर काश्मीरचा मुद्दा मांडत आला आहे. मात्र, आता सौदी अरेबिया आणि यूएईच्या या स्पष्ट संदेशामुळे पाकिस्तानला एक तर आपली अर्थव्यवस्था वाचवावी लागेल आणि काश्मीरचा राग आळवणे बंद करावे लागेल.
कामरान युसूफ यांनी याबद्दल एक ट्विट सुद्धा केले आहे.
As our economic crisis deepens, "friendly" countries advise Pakistan to make peace with India & move on from Kashmir.
Exclusive details 👇 https://t.co/GrlNIgXb3s
— Kamran Yousaf (@Kamran_Yousaf) January 27, 2023
सौदी अरेबिया पाकिस्तान सोडून भारताशी मैत्री का करत आहे?
पाकिस्तानने भारतासोबत शांततेचा मार्ग स्वीकारावा, असेही सौदी अरेबिया आणि यूएईने म्हटले आहे. जनरल बाजवा आणि इम्रान खान यांच्या काळात यूएई ने भारतासोबत चर्चेची व्यवस्था केल्याचे वृत्त पसरले होते असे म्हटले जाते की जनरल बाजवा यांनी काश्मीरवर भारताशी करार करण्यास सहमती दर्शविली परंतु इम्रान खान यांनी अचानक त्या निर्णयाची माघार घेतली. जनरल बाजवा यांच्या निकटवर्तीयाने दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी पाकिस्तानला भेट देणार होते पण इम्रान खान यांनी अचानक माघार घेतल्याने ते शक्य होऊ शकले नाही.
कामरान पुढे असेही म्हणाले की, सौदी अरेबिया आणि यूएई या दोन्ही देशांनी भारतासोबत आर्थिक संबंध मजबूत केले आहेत. या दोन देशांनी काश्मीरमध्ये मोठी गुंतवणूक करावी आणि पैसा कमवावा, अशी भारताची इच्छा आहे. सौदी अरेबिया आणि यूएई या दोन्ही देशांना तेलाऐवजी इतर क्षेत्रांतून कमाई करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. सौदी अरेबिया आणि यूएईमधील अनेक व्यावसायिक काश्मीरवरील बैठकीला उपस्थित होते. काश्मीर हा वादग्रस्त क्षेत्र मानणाऱ्या पाकिस्तानला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
‘काश्मीर प्रश्नावर आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकत नाही’
पाकिस्तानी पत्रकार कामरान पुढे म्हणाले की, पाकिस्तानने विरोध केला तेव्हा यूएई आणि सौदी या देशांनी आम्ही आता काश्मीरवर जाहीरपणे तुमचे समर्थन करू शकत नाही. असे जाहीर केले. यूएई आणि सौदी अरेबियाने सांगितले की, आम्ही भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देतो. भारतासोबतचा पाकिस्तानचा वाद आपण सोडवू शकतो, अशी भूमिकाही त्यांनी त्यावेळी मांडली. त्यामुळेच शाहबाज शरीफ यांनी यूएई दौऱ्यात भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे आवाहन करत यूएईकडे मदतीची याचना केली होती. सौदी आणि यूएईने त्यांना काश्मीर प्रश्न वगळून सध्याच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करायला सांगितला.