नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

भारतीय संस्कृतीत कायमच माणसांच्या जीवा इतकेच महत्त्व प्राण्यांच्या जीवालाही देण्यात आले आहे. भारताच्या याच संस्कृतीची प्रचिती भारत सरकारने पुन्हा एकदा जगाला करून दिली आहे. कारण जेव्हा एकीकडे जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असताना, भारताने आपल्या नागरिकांच्या सोबतच आपल्या देशातील श्वानांना देखील वाचवून मायभूमीत परत आणले आहे.

भारत तिबेट बॉर्डर पोलिसचे हे श्वान आहेत. भारतीय सैन्यासोबत या शूरवीर श्वानांनानाही एअरलिफ्ट करून आपल्या मायदेशात परत आणले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी १७ एअरक्राफ्ट मधून या श्वानांना काबुल मधून गुजरात येथील जामनगरच्या एअरफॉर्स स्टेशनला आणण्यात आले. तर नंतर त्यांना दिल्ली येथील भारत तिबेट बॉर्डर पोलीसच्या कॅम्पमध्ये धाडले गेले.

हे ही वाचा:

उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

खादी व ग्रामोद्योग लेहमध्ये फुलवणार हिरवळ

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

माया, बॉबी आणि रुबी अशी या तीन श्वानांची नावे आहेत. लॅब्रेडोर, डॉबरमॅन आणि बेल्जियन मेलीनोईस प्रजातीचे हे तीन श्वान आहेत. त्यांचे प्रशिक्षण हरियाणातील पंचकुला येथील प्रसिद्ध अशा श्वान प्रशिक्षण केंद्रात झाले आहे. २०१९ साली या तिन्ही श्‍वानांना काबुल येथे पाठवण्यात आले होते. काबुल येथील भारतीय दूतावासात या श्वानांना ठेवले गेले होते. तेव्हापासून या श्वानांनी काबुल मधील भारतीय दूतावासाच्‍या, भारतीय राजदुतांच्या आणि इतकच नाही तर अफगाण नागरिकांच्या सुरक्षेमध्येही एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Exit mobile version