अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार ८ कोटी २० लाख डॉलरचा असेल. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध तर मजबूत होणारच आहेत. सोबत शत्रू देशांनाही धडकी भरणार आहे. भारताकडे हार्पून मिसाईल आल्यानं हिंद आणि प्रशांत महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. यामुळे समुद्री सीमांचं संरक्षण करण्यात भारत आणखी समर्थ होईल. अमेरिकेने स्वतः या निर्णयाची माहिती दिली आहे.
अमेरिकेने म्हटलं आहे, “‘डिफेंस सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने सोमवारी (२ ऑगस्ट) या संबंधी अमेरिकेच्या संसदेला अधिसूचित करण्यात आलंय. हार्पून एक जहाज विरोधी क्षेपणास्त्र आहे. भारताने एक जेसीटीएस खरेदी करण्याबाबत विचारणा केली होती. यात एक ‘हार्पून इंटरमीडिएट लेव्हल’ देखरेख स्टेशन, सुटे भाग आणि दुरुस्ती, परीक्षण संबंधी उपकरण, प्रक्षेपण आणि तांत्रिक दस्तावेजीकरण, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, अमेरिका सरकार आणि ठेकेदाराकडून तांत्रिक , इंजीनियरिंग आणि इतर मदत सेवा या मुद्द्यांचा समावेश आहे.”
हे ही वाचा:
भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला
इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायला भारत सज्ज
‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर
ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी
या क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत ८ कोटी २० लाख डॉलर आहे. डीएससीएने म्हटलं, “या प्रस्तावित विक्रीमुळे भारतीय-अमेरिकेतील संबंधांत सुधारणा होईल. तसेच एका मोठ्या संरक्षण भागीदाराची सुरक्षा वाढवण्यात मदत करुन अमेरिका आपली परदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करेल. भारत हिंद-प्रशांत आणि दक्षिण आशिया क्षेत्रात राजनैतिक स्थिरता, शांतता आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची शक्ती आहे.”