रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघांनी तत्काळ बैठक बोलावली. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा मसुदा ‘व्हेटो’ केला आहे. सुरक्षा परिषदेत अनेक देशांकडून रशियाच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रसंघाने रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताने सावध पवित्रा घेत संपूर्ण प्रकरणात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या आक्रमणाविरोधात ठराव मांडण्यात आला. या ठरावावर सार्वमत घेण्यात आले. त्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी बहिष्कार टाकला. भारत आणि चीनसोबतच संयुक्त अरब अमिरातीनेही या ठरावावर बहिष्कार टाकला आहे. याआधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने दोनही देशांना शांतता ठेवण्याचे आणि युद्ध टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर भारताने कोणताही आक्रमक पवित्रा घेतला नाही.
#UkraineRussiaCrisis India has abstained from the UNSC resolution that condemned Russia's 'aggression' against Ukraine
3 countries, including India, China, UAE abstained.
11 countries voted in favour of the resolution while Russia used its veto power (to block the resolution). pic.twitter.com/UGr6PQJSgu— ANI (@ANI) February 26, 2022
हे ही वाचा:
जापनीज बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची २७ व्या मजल्यावरून उडी
पुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे
स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कविता’चे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन
रशियाचे यूएन राजदूत वसिली नेबेन्झिया यांनी संबंधित ठरावाचे समर्थन न करणाऱ्या देशांचे आभार मानले. तसेच ठरावाला पाठिंबा देणाऱ्या देशांचं त्यांनी ‘रशियाचे विरोधक’ म्हणून वर्णन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोन वर चर्चा केली होती. तेव्हाही त्यांनी युद्ध टाळून चर्चा करून प्रश्न सोडवावा असा सल्ला त्यांना दिला होता. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्राधान्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. यावर पुतीन यांनी सकारात्मकता दर्शवली होती.