अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी

गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी

अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना दुसरीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसला आहे. हश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. एकूण ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हा मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. मात्र, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांना ३४ प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयात खटला दाखल झाल्यापासून ट्रम्प यांनी स्वतःला निर्दोष म्हणून जाहीर केले होते. आता त्यांना दोषी ठरवल्यानंतर हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे आता ते राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत सहभागी असतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. न्यायालयाने त्यांना अद्याप शिक्षा सुनावलेली नाही.

या प्रकरणात ११ जुलै रोजी पुढील सुनावणी होईल. त्या दिवशी शिक्षा ठोठाविण्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकन कायद्यानुसार, त्यांना चार वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यावर ३४ प्रकरणात दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यात त्यांना अमेरिकन न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यामध्ये निवडणुकीतील निकालात हे फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप, लैंगिक शोषण आणि लाचखोरी सारख्या प्रकरणांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू!

नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये एका सेक्स स्कँडल प्रकरणातून वाचण्यासाठी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. सेक्स स्कँडल समोर आल्यास त्याचा मोठा परिणाम त्यांच्या उमेदवारीवर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गैरव्यवहार केल्याचं सांगितलं जातं. डोनाल्ड ट्रम्प याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना चार वर्ष तुरुंगात राहावं लागू शकतं. अमेरिकेच्या संविधानानुसार गंभीर गुन्ह्यातील दोषी व्यक्तीला अध्यक्ष होता येत नाही. मात्र, याप्रकरणी ट्रम्प पुढच्या कोर्टामध्ये निर्णयाला आव्हान देणार आहेत.

Exit mobile version