दिवाळीच्या सुट्यांमध्ये देशभरात फिरण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी विमानाच्या तिकिट आरक्षणामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आरक्षित केलेल्या तिकिटांची संख्या अधिक आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये जर गोवा, कोचीन आणि दिल्ली येथे जाण्यासाठी हवाई प्रवास करायचा असल्यास सध्या विमानाच्या तिकिटांचे दर कमी आहेत. मात्र श्रीनगर, लेह, वाराणसी आणि पटनासाठीचे तिकीट दर वाढत आहेत.
कोरोनापूर्व परिस्थितीमध्ये या काळात लोक पुढील वर्षीसाठी उन्हाळ्यांच्या सुट्टीसाठी तिकिटांचे आरक्षण करत असत, शिवाय आता पर्यंत दिवाळीच्या दरम्यानचे सर्व तिकिटे आरक्षित झालेली असायची, असे वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांनी सांगितले. मात्र आता कोरोनामुळे काही बदल झाले आहेत आणि आमच्याकडे आरक्षणाची चौकशी होताना पुढील आठवड्यातील किंवा फार फार तर पुढील महिन्यासाठीची होत आहे. त्यापुढील आरक्षणाची चौकशी फार केली जात नाही, असेही वीणा पाटील म्हणाल्या.
ही वाचा:
पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी
कोरोनाचाचणीच्या प्रमाणपत्राचे गणेशभक्तांपुढे विघ्न
अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट
मोनिकाच्या हाताच्या स्पर्शातून त्यांना जाणवले मुलाचे अस्तित्व
आरक्षणाबाबतचे हे बदल आता तिकीट दरांमध्येही दिसून येत आहेत. नोव्हेंबरमध्ये मुंबईवरून लेह, देहराडून आणि श्रीनगरला जाण्यासाठी तिकीट दर कमी आहेत. मात्र वाराणसी, पटना इथे जाण्यासाठी हवाई तिकीट दर जास्त आहेत. विमानांच्या तिकिटांचे दर हे ३० दिवसाच्या हिशोबाने ठरवले जातात. स्वस्तात तिकीट हवी असल्यास ३० दिवसांपूर्वी तिकीट आरक्षित करायची, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा परिणाम विमानाच्या तिकीट दरांवर दिसून येत आहे.
यावर्षी विमान तिकिटांच्या आरक्षणात २०२० पेक्षा जास्त वाढ झाली असून २०१९ पेक्षा ही वाढ कमीच आहे, असे मुख्य व्यवसाय अधिकारी प्रल्हाद कृष्णमूर्ती यांनी सांगितले. हॉटेल आरक्षणातही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.