धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

युसेफ मेहराद आणि सदरोल्लाह फाजेली झारे या दोन व्यक्तींना इराणमधील अराक तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली.

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

इस्लामिक देशांमध्ये फाशीची शिक्षा देण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच, इराणने सोमवारी ईश्वरनिंदा केल्याबद्दल दोषी ठरलेल्या दोन व्यक्तींना फाशी दिली. ओस्लोस्थित इराण मानवाधिकार गटाच्या म्हणण्यानुसार, इराण हा जगातील सर्वाधिक फाशी देणाऱ्यांपैकी एक देश आहे, त्याने यंदाच्या वर्षी किमान २०३ कैद्यांना मृत्युदंड दिला आहे. परंतु ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली फाशी देणे ही दुर्मिळ घटना आहे. पूर्वीच्या प्रकरणांमध्ये ही शिक्षा कमी करण्यात आली होती.

युसेफ मेहराद आणि सदरोल्लाह फाजेली झारे या दोन व्यक्तींना इराणमधील अराक तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. ‘यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’च्या म्हणण्यानुसार, ‘अंधश्रद्धा आणि धर्मावरील टीकाकार’ या टेलीग्राम ऍपवरील चॅनेलमध्ये सामील असल्याचा आरोप करून त्यांना मे २०२०मध्ये अटक करण्यात आली होती. दोघेही अनेक महिने एकांतवासात होते. या दरम्यान ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे.

इराणच्या न्यायपालिकेच्या मिझान वृत्तसंस्थेने फाशीच्या वृत्ताला दुजोरा दिला. या दोघांनी मुहम्मद पैगंबर यांचा अपमान करून नास्तिकतेचा प्रचार केला, असे त्यांनी म्हटले आहे. मिझानने त्यांच्यावर कुराण जाळल्याचा आरोपही केला, मात्र त्या दोघांनी कृत्य केले होते का किंवा त्याची छायाचित्रे टेलिग्राम चॅनेलवर शेअर केली होती, हे स्पष्ट होऊ शकले नाही. इराणने ईश्वरनिंदेसाठी शेवटची फाशी कधी दिली होती, हेदेखील कळू शकले नाही. सौदी अरेबियासारखे पश्चिम आशियातील इतर देशही ईश्वरनिंदेसाठी मृत्युदंडाच्या शिक्षेला परवानगी देतात. इराण मानवाधिकार गटानुसार, सन २०२२मध्ये, इराणने किमान ५८२ लोकांना फाशी दिली. सन २०२१मध्ये हीच संख्या ३३३ होती.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या केरळ स्टोरीवरील बंदीविरोधात निर्माते गेले सर्वोच्च न्यायालयात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याचा अभिनेत्रींवर आरोप

इराणने आणखी दोन अभिनेत्रींवर महिलांसाठी असलेल्या पोषाखांच्या नियमांचे (ड्रेस कोड) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बरन कोसारी (३७) आणि शाघायेघ देघन (४४) अशी या दोघींची नावे असून त्या इराणी सिनेमातील भूमिकांसाठी ओळखल्या जातात. अलीकडच्या दिवसांत सार्वजनिक ठिकाणी हिजाबशिवाय दिसल्यास महिलांवर स्वतंत्र कायदेशीर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोषी आढळल्यास अभिनेत्रींना दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २२ वर्षीय कुर्दिश-इराणी महसा अमिनी हिच्या कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या निषेधाच्या लाटेनंतर इराणच्या ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.

Exit mobile version