रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धांत झाला होता हा घोळ…

रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धांत झाला होता हा घोळ…

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या १० पेक्षा जास्त बाऊट्समध्ये घोळ झाल्याचे आता तपासातून उघड झाले आहे.

पैशासाठी किंवा इतर फायद्यांसाठी फेरफार करण्यात आल्याचे एका स्वतंत्र तपासात उघड झाले आहे. हे प्रकरण उघड झाल्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए) ने आगामी पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पंचांची निवड प्रक्रिया कठोर करण्याचे आश्वासन दिले आहे.

एआयबीएला मॅक्लारेन ग्लोबल स्पोर्ट्स सोल्युशन्स (एमजीएसएस) च्या पहिल्या टप्प्यातील बॉक्सिंगच्या स्वतंत्र तपासाचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालानुसार रिओमध्ये अधिकार्‍यांमार्फत फेरफार करण्याची यंत्रणा अस्तित्वात होती. दोन फायनलसह एकूण १४ सामने तपास यंत्रणांकडे आहेत. क्रीडा क्षेत्रातील अधिकार्‍यांच्या संशयास्पद नियुक्त्यांचा संदर्भ या अहवालात देण्यात आला आहे. रिओमध्ये भ्रष्ट लोकांना कामावर ठेवण्यात आले कारण, ते दबावाखाली फेरफार करण्याच्या कोणत्याही विनंतीला पाठिंबा देण्यास तयार होते, तर विरोध करणारे अधिकारी बाहेर काढले गेले.

हे ही वाचा:

सावधान!! इथे यूटर्न नाही!

सोशल मीडियावर खड्डाखडी; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली

काँक्रीटच्या जंगलात वाढला बिबट्याचा वावर!

मुंबई विमानतळावर सापडले ५ किलो अमली पदार्थ

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपूर्वी रिओच्या निकालांमध्ये फेरफार करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि २०१६ च्या रिओ स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेदरम्यान त्या वापरण्याचा प्रयत्न झाल्याचे अहवालात म्हटले आहे. एआयबीएकडून पैसे आणि फायद्यांसाठी किंवा राष्ट्रीय फेडरेशन आणि त्यांच्या ऑलिम्पिक समित्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि काही प्रसंगी स्पर्धेच्या यजमानांच्या आर्थिक पाठिंब्यासाठी आणि राजकीय पाठिंब्यासाठी या लढतींमध्ये फेरफार करण्यात आला होता, असे म्हटले आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासात असे निष्कर्ष काढले गेले आहेत की, अशा फेरफार प्रकरणांमध्ये अनेक वेळी सहा अंकांची मोठी रक्कम सामील होती. हेराफेरीची पद्धत भ्रष्ट रेफरी, पंच आणि ड्रॉ कमिशनशी संबंधित होती. त्यानंतर एआयबीए ने आगामी स्पर्धांमध्ये पंचांची निवड प्रक्रिया कठोर करण्याचे आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून पुन्हा मान्यता मिळवण्याची मागणी करणाऱ्या एआयबीएने म्हटले आहे की, एआयबीए रिओ २०१६ बॉक्सिंग स्पर्धेच्या तपासणीच्या निकालांबाबत चिंतीत असून सध्याच्या एआयबीए स्पर्धांची अखंडता राखण्यासाठी सुधारात्मक उपाय केले जातील.

पहिला सामना जागतिक आणि युरोपियन चॅम्पियन मायकेल कोनलन आणि रशियाचा व्लादिमीर निकितिन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा होता. यामध्ये रिंगवर वर्चस्व असूनही कॉनलनला पराभवाला सामोरे जावे लागले. कॉनलनने कॅमेरासमोर रेफरी आणि पंचांशी गैरवर्तन केले होते. दुसरा रशियाचा येवगेनी तिश्चेन्को आणि कझाकिस्तानचा वसिली लेवित यांच्यात हेवीवेट सुवर्णपदकाचा सामना होता. वर्चस्व असूनही लेविटला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आता २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेड, सर्बिया येथे सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी नियुक्त केलेले रेफरी, पंच आणि तांत्रिक अधिकारी यांना कठोर निवड प्रक्रियेतून जावे लागेल, ज्यात रिचर्ड मॅकलारेन यांच्या नेतृत्वाखालील एमजीएसएच्या पार्श्वभूमी आणि इतर तपासण्यांचाही समावेश असेल.

Exit mobile version