आपल्याकडे सर्वात श्रेष्ठ काही असेल तर ते म्हणजे दान आनंदासाठी आपल्याकडे आपले सर्वस्व दान केलेल्या व्यक्ती आपल्याकडे होऊन गेल्या आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्रात अवयवदान आपल्याकडे सर्वश्रेष्ठ मानले आहे. आणि आजच्या जगात त्याची गरज सुद्धा निर्माण झाली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूनंतर आपले शरीर दान करते तेव्हा एकाच वेळेस आठ ते नऊ लोकांना नवजीवन मिळण्याची संधी असते. म्हणजेच यामुळे आठ ते नऊ लोकांचे जीवन चांगले बनते. ‘आज देशात अवयवदानाची जागृती वाढली असून हि खूप समाधानाची बाबा असल्याचे’ पंतप्रधान मोदी यांनी आज मन कि बात मध्ये म्हंटले आहे.
२०१३ मध्ये आपल्या देशात अवयवदानाची पाच हजारपेक्षा कमी प्रकरणे होती, पण आता २०२२ मध्ये हीच संख्या आता १५ हजारपेक्षा जास्त झाली आहेत. यामध्ये राज्याच्या अधिवासाची अट काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण कोणत्याही राज्यात जाऊन आपल्याला अवयव मिळण्यासाठी नोंदणी करू शकतो. याशिवाय ६५ वर्षाखालील वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आजच्या ‘मन की बात’च्या ९९ व्या भागात पंतप्रधान मोदी यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना म्हंटले आहे.
पंजाबमधील अमृतसरच्या रहिवासी सुखबीर सिंग संधू आणि त्यांची पत्नी सुप्रित कौर यांना एक सुंदर मुलगी झाली जिचे नाव त्यांनी अबाबात कौर ठेवले. सुखबीर यांनी मोदींना सांगितले कि, बाळाच्या मेंदूमध्ये मज्जातंतूंचा समूह आहे ज्यामुळे तिच्या हृदयाचा आकार मोठा झाला असून ती फक्त ३९ दिवसांची होती तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला. तिचा जन्म म्हणजे त्यामागे काहीतरी देवाचा हेतू होता म्हणून त्यांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांची कहाणी ऐकून अनेक लोक एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येतील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!
वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’
कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार
सुखबीरजी यांना डॉक्टरांनी सांगितले कि त्यांची मुलगी सर्वात तरुण दाता बनली आहे. तिच्या सगळ्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण केले त्यावेळेस त्यांची मान आपल्या लेकीसाठी अभिमानाने उंचावली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आता नवरात्रीची वेळ आहे, शक्तीची उपासना करण्याची वेळ आहे. भारत देशाची क्षमता आता एका नव्या कोनातून समोर येत आहे. यामध्ये आपल्या स्त्रीशक्तीचा खूप मोठा वाटा आहे आणि याची अनेक उदाहरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना तुम्ही सोशल मीडियावर बघितले असेल. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवून त्या पहिली महिला लोको पायलट बनल्या आहेत. झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांचा मुलगा अभिजित चौधरी यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. ज्यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान केले. अभिजित यांनी सांगितले कि त्यांच्या मुळे चार जणांना जीवदान मिळाले तर दोघांना दृष्टी परत मिळाली. त्यांच्या या समाजसेवेबद्दल पंतप्रधानांनी त्यांना सलाम केला.