शुक्रवार ३१ मे रोजी सकाळी जर्मनीतील मॅनहाइम शहरात कट्टर इस्लामवाद्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जखमी झाले. यूट्यूबवरील लाइव्ह कार्यक्रमात हा क्षण टिपला गेला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकी ठार झाल्याचे समजते.
सिटिझन्स मुव्हमेंट पॅक्स युरोपा (बीपीई) नावाच्या संघटनेने युरोपमधील वाढत्या इस्लामवादाच्या विरोधात राजकीय कार्यक्रम आयोजित केला होता. त्यापूर्वी हा हल्ला झाला. इस्लामवाद विरोधी गटाचे प्रमुख समीक्षक, मायकेल स्टुअरझेनबर्गर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. व्हिडीओमध्ये इस्लामी व्यक्ती अंदाधुंदपणे लोकांना चाकू मारताना दिसत आहे.
हे ही वाचा:
अंबानींच्या क्रूझचे टायटॅनिक व्हावे… स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्माची अभद्र भाषा
मोदी जिंकले तर न्यायालयात जाऊ…जनआंदोलन उभारू… विरोधी पक्ष, आंदोलनजीवी, पाळीव पत्रकारांची योजना
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
नागपूरमध्ये तापमान ५६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेच नाही
प्रेक्षकांनी चाकूचा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. हा अतिरेकी लोकांवर हल्ला करताना दिसत आहे. त्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मानेवर आणि शरीरावर अनेक वार केले. दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने या अतिरेक्यावर गोळी झाडली. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेनंतर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ‘सध्या मॅनहाइममधील मार्केट स्क्वेअरवर पोलिसांची मोठी कारवाई सुरू आहे. एक बचाव हेलिकॉप्टरही तैनात असून अधिक माहिती देता येणार नाही,’ असे पोलिसांनी सांगितले.