इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

निवडणूक आयोगाने केले अटक वॉरंट जारी

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

Pakistani Prime Minister Imran Khan. (File Photo: IANS)

उच्च न्यायालयाकडून जिल्ह्या न्यायालयाच्या अटक वॉरंटवर स्थगिती आदेश मिळाल्याने इम्रान खान यांनी निश्वास टाकला असतानाच ,आता त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत. इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान ‘तेहरीक- ए- इन्साफ’ चे नेते फवाद चौधरी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने अटक वॉरंट जरी केले आहे.   पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय खंडपीठाने मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुलतान राजा यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपण्णी केल्याप्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे.

निसार अहमद दुर्रानी , बाबर हसन भरवाना , शाह मोहम्मद जातोई , आणि निवृत्त नायमूर्ती इकराम उल्ला खान यांचा समावेश असलेल्या या चार सदस्यांच्या खंडपीठा समोर इम्रान खान ऊपस्थित राहिले नव्हते. म्हणूनच आयोगाने इमरान यांच्याबरोबर जेष्ठ नेते फवाद चॉउधारी यांच्याविरोधात वेगळा अटक वारंट जरी केला आहे. प्रतिवादींना अनेक वेळा वैयक्तिकरित्या हजार राहण्यास सांगून सुद्धा ते हजार राहिलेले नाहीत म्हणून आदेश जरी केले आहेत.

काय आहेत आयोगाचे आरोप?

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हंटले आहे कि, इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांमार्फत अटक वारंट बजावण्यात आला होता. १४ मार्च ला इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाने म्हंटले आहे कि, इम्रान खान यांनी मुद्दाम काही कारणाने सुनावणी तहकूब करण्याची मागणी करून हजार राहण्यास टाळाटाळ केली. हि कायद्याची पायमल्ली आहे. असे आयोगाने ठणकावून सांगितले

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते फवाद चॉउधारी या आदेशावर म्हणाले कि, निवडणूक आयोगाचा हा आदेश लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. सहा जानेवारीला लाहोर उच्च न्यायालयाने या प्रकरणी इम्रान खान , पक्षाचे सरचिटणीस असद उमर, फवाद चौधरी यांच्याविरोधात अटक वॉरंट स्थगित केले आहे. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयांत बोलावले जाईल. असे ट्विट सुद्धा फवाद चौधरी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर

हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा

नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित

वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट

फवाद चौधरी यांनी आदेशावर केली टीका
या आदेशावर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते फवाद चौधरी म्हणाले की, निवडणूक आयोगाचा हा आदेश लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. लाहोर उच्च न्यायालयाने ६ जानेवारीला या प्रकरणी इम्रान खान, फवाद चौधरी आणि पक्षाचे सरचिटणीस असद उमर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट स्थगित केले होते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयात बोलावले जाईल, असे ट्विट फवाद चौधरी यांनी केले आहे.

Exit mobile version