तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश

तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. अखेर या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची १४ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडायच्या काही दिवस आधी तोशाखाना प्रकरणामध्ये इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना शिक्षा झाली होती. तसेच इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास निर्बंध घालण्यात आले होते. याशिवाय त्यांना प्रत्येकी ७८७ पाकिस्तानी दशलक्ष रुपयांचा म्हणजेच जवळपास २३ कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर या प्रकरणाची सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर पार पडली. यावेळी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच या शिक्षेविरोधातील याचिकेवर ईदच्या सुट्टीनंतर सुनावणी पार पडेल, असे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!

छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप

दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आणि बंगालमध्ये ममता म्हणतात, काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत

पाकिस्तानमध्ये लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या भेटवस्तू या तोशखाना विभागामध्ये जमा कराव्या लागतात. मात्र, इम्रान खान यांनी त्यांना मिळाळेल्या मौल्यवान भेटवस्तू जमा न करता विकल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तसेच त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान खान २०१८ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर होते. यावेळी त्यांना मिळालेल्या भेट वस्तू तोशखाना विभागात जमा न केल्याप्रकरणी हे प्रकरण सुरू आहे.

Exit mobile version