इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी

इम्रान खान यांना भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने आठ दिवसांची ‘एनएबी’ (नॅशनल अकाऊंटेबिलीटी ब्युरो) कोठडी सुनावली

इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी

अल कादीर ट्रस्ट प्रकरणात गैरमार्गाने संपत्ती मिळविल्याच्या आरोप प्रकरणी अटक झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इम्रान खान यांना भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने आठ दिवसांची ‘एनएबी’ (नॅशनल अकाऊंटेबिलीटी ब्युरो) कोठडी सुनावली आहे. इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात आरोप निश्चित केल्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

एनएबीने इम्रान खान यांची १४ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली तर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या मुक्ततेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अल कादीर ट्रस्टमुळे सरकारी तिजोरीचे ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्यापूर्वी, इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांच्याविरोधात आरोप निश्चित केले.

इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या किंमती वस्तू त्यांनी तोशखाना विभागाकडून स्वस्तात विकत घेतल्या होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे. नियमानुसार, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना मिळालेल्या भेटवस्तू तोशखाना विभागाकडे जमा कराव्या लागतात. यासंबंधी केलेल्या व्यवहारांसंबंधी लपवाछपवी केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या

राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !

हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्ववत

इम्रान अटकेनंतर पाकिस्तानात निर्माण झालेल्या अराजकाला म्हणे नरेंद्र मोदी जबाबदार!

इम्रान खान यांना बुधवार, ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातूनच पाकिस्तानी रेंजर्सच्या सैनिकांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने इम्रान खान यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली. आता एनएबीचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहेत.

Exit mobile version