इम्रान खान यांना तुरुंगात माश्या, किड्यांचा त्रास

तुरुंगातून बाहेर काढण्याची मागणी

इम्रान खान यांना तुरुंगात माश्या, किड्यांचा त्रास

तोशाखान भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तुरंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात कीटक आणि माश्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वकिलांकरवी या तुरुंगातून आपल्याला बाहेर काढावे, अशी विनंती केली आहे.

इम्रान खान यांना कोठडीत दिवसा माश्या आणि रात्री कीटकांचा त्रास होत आहे. त्यामुळे या कोठडीत त्यांना राहायचे नाही, असे इम्रान यांच्या वकिलाने सांगितले. सोमवारी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने इस्लामाबाद उच्च न्यायालयात पक्षप्रमुख खान यांना पंजाब प्रांतातील अटॉक तुरुंगातून रावळपिंडीच्या उच्च सुरक्षा असलेल्या अदियाला तुरुंगात हलविण्यात यावे, अशी याचिका केली. याचिकेत उच्च न्यायालयाला खान यांना अ-वर्ग सुविधा उपलब्ध असलेल्या तुरुंगात हलवण्याची विनंती केली आहे आणि त्याचे कुटुंब, वकील आणि डॉक्टर फैसल सुलतान यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

अटॉक तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान यांनी त्यांच्या वकिलाला तुरुंगातील भेटीदरम्यान तेथून बाहेर काढण्यास सांगितले. “मला तुरुंगात राहायचे नाही, मला येथून बाहेर काढा,” असे इम्रान यांनी सांगितल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. इम्रान खान यांचे वकील नईम हैदर पंजोथा यांनी इम्रान खान यांची तुरुंगात भेट घेतली. इम्रान यांना त्रासदायक परिस्थितीत ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांना क दर्जाच्या तुरुंगसुविधा पुरवल्या जात आहेत, असे वकिलाने सांगितले.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या कथित ‘फ्लाइंग किस’विरोधात तक्रार

गाडी चोरली, रंग बदलला, पण हॉर्न बदलला नाही आणि घात झाला!

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा

तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरवल्यानंतर शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या दोषी आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला आव्हान देऊन हा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version