पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात संसदेत विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडला आहे. तरी या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि इमरान खान यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे खासदार मतदान करणार आहेत.
८ मार्च, रोजी पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने तिथल्या संसदेच्या खालच्या सभागृहात इम्रान खान यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ या पक्षाच्या तब्बल २४ खासदारांचे समर्थन असल्याचे म्हटले जात आहे. हा आकडा आणखीही जास्त असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाच्या २४ खासदारांनी आपण इम्रान खान यांच्या विरोधात मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जपानचे पंतप्रधान येणार भारतात
कोल्हापूरमधून जप्त केला २५ लाखांचा मद्यसाठा
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला
हे सर्व बंडखोर खासदार सध्या सिंध हाऊस येथे राहत आहेत. ही एक सरकारी इमारत असून इस्लामाबाद मध्ये सिंध प्रांतातून येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या राहायची व्यवस्था या ठिकाणी होते. या सर्व खासदारांना आपल्या अपहरणाची भीती वाटत असल्यामुळे ते या ठिकाणी आश्रयाला आले आहेत. इम्रान खान यांनी आपल्याला हा विश्वास दिला की आम्ही त्यांच्या विरोधात मतदान केले तरी ते आमच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाहीत, तर आम्ही खासदारांसाठी असलेल्या अधिकृत निवासस्थानी जाऊ असे या बंडखोर खासदारांकडून सांगण्यात येत आहे.