पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एका दूरचित्रवाहिनीवर दावा केला आहे कि , ‘माझ्या हत्येसाठी पुन्हा एकदा कट रचला जात आहे, झरदारींनी दहशतवाद्यांना यासाठी पैसे दिले असल्याचे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. इम्रान खान म्हणाले की, आता आसिफ अली झरदारी यांनी त्यांना मारण्यासाठी प्लॅन सी तयार केला आहे. आसिफ अली झरदारी यांच्यावर आरोप करताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. सध्या पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट आहे. डॉलर च्या तुलनेत पाकिस्तानचे चलन रसातळाला गेले आहे. एक तोळ्याचा सोन्याचा भाव दोन लाखांवर गेला आहे. देशातील महागाई शिगेला पोचली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाचे माजी राष्ट्रपती “आसिफ अली झरदारी” यांच्यावर आरोप केला आहे.कि, त्यांनी दूरचित्रवाहिनीवरील भाषणादरम्यान सांगितले की, पंतप्रधानपदावरून त्यांची हकालपट्टी होताच त्यांना मारण्याची योजना आखण्यात आली होती. यापूर्वी एका जाहीर सभेत त्यांनी सांगितले होते की, या योजनेत चार लोक सामील होते, ज्यांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. इम्रान म्हणाला, “जेव्हा मी झरदारींच्या या कटाबद्दल खुलासा केला तेव्हा त्यांनी ते नाकारले असे एका टीव्ही वरील मुलाखतीत त्यांनी सांगितले.
“I’m afraid that if the situation remain like this our National security will be compromised”-@ImranKhanPTI pic.twitter.com/0WeJGm2ONa
— PTI (@PTIofficial) January 27, 2023
पुढे ते म्हणाले कि , धर्माच्या नावावर मला संपवण्यासाठी आधी त्यांनी प्लॅन बी तैयार केला होता. वजिराबाद हल्ल्याचा यासंदर्भात त्यांनी उदाहरण दिले. मला त्यांच्या या योजना कळल्याचे मी जाहीर सभेत दोनदा उघड केले. त्यांच्या या हल्ल्यात ते बरेच यशस्वी झाले पण दैव बलवत्तर म्हणूनच वाचलो.
हे ही वाचा:
इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा
अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!
‘आसिफ अली झरदारींचा प्लॅन सी तयार’
आसिफ अली झरदारींनी इम्रान खान यांना मारण्यासाठी आता प्लॅन सी तयार केला आहे. आसिफ अली झरदारी यांच्यावर आरोप करताना इम्रान खान मुलाखतीत पुढे म्हणतात की, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, जो त्यांनी सरकारमध्ये असताना लुटला आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना असे पैसे जमवण्याची आयती संधीच मिळाली ते म्हणाले की, झरदारी खैबर पख्तुनख्वा किंवा गिलगिट बाल्टिस्तानमधील निवडणुकांमध्ये पैसे जमवतात याशिवाय आसिफ अली झरदारी यांनी दहशतवादी संघटनेला पैसे दिले आहेत आणि त्यांचे शक्तिशाली लोक एजन्सीमध्ये सामील आहेत. म्हणूनच ते मला मारण्यासाठी सहज कात रचू शकतात.
पुढच्या गुन्ह्यासाठी नियोजन
इम्रान खान पुढे म्हणतात की, आसिफ अली झरदारी यांनी पुढचा गुन्हा करण्याची योजना आखली आहे. यासाठी त्यांनी तीन पक्षांशी त्यांनी संगनमत केले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष म्हणाले की, जे काही नियोजित आहे, ते वजिराबाद हल्ल्यादरम्यान झालेल्या जखमांमधून बरे होताच परत कामासाठी रुजू होतील . त्यांना काही झालेच तर देशाला कळले पाहिजे, असे ते म्हणाले. आजच्या काळात पाकिस्तानातील जनता सुरक्षित नाही. एका सरकारी अधिकाऱ्याने शुक्रवारी २७ जानेवारीला पीटीआयला सांगितले की , “खान यांच्या निवासस्थानी तैनात केलेले किमान २७५ पोलिस मागे घेण्यात आले आहेत.” शेहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि आयएसआय मेजर जनरल फैसल नसीर यांना यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. .