इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन पण; निवडणूक लढवण्याचा मार्ग बंदचं

लष्करी आस्थापनांवर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात अंतरिम दिलासा

इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन पण; निवडणूक लढवण्याचा मार्ग बंदचं

पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन बहाल केला आहे. लाहोर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. पण, या आदेशामुळे इम्रान खान यांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होण्याबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही. ९ मे रोजी लष्करी आस्थापनांवर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १३ जानेवारीला ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) ‘क्रिकेट बॅट’ हे निवडणूक चिन्ह काढून घेतले. त्यानंतर आता पीटीआयकडून निवडणूक लढणाऱ्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने यापूर्वीच इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचे उमेदवारी अर्जही फेटाळले आहेत.

इम्रान खान यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती आलिया नीलम आणि न्यायमूर्ती फारुक हैदर यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. त्यात लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाच्या (ATC) ९ मे रोजी झालेल्या प्रकरणातील खटल्यांमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला आणि तोषखानामधील दोषी ठरवल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, इम्रानचे वकील बॅरिस्टर सलमान सफदर यांनी न्यायालयाला सांगितले की, ट्रायल कोर्टाने त्यांच्या अशिलाचा जामीन अर्ज “कायद्याचे उल्लंघन करून” फेटाळला. याचिकाकर्ता तुरुंगात असल्याने त्याच्या जामिनाच्या सुनावणीसाठी ट्रायल कोर्टात हजर राहू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. ट्रायल कोर्टाने खटला न चालवण्याचा जामीन अर्ज फेटाळला तेव्हा इम्रान खान तुरुंगात होते. त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी ट्रायल कोर्टाने त्यांना तुरुंगातून समन्स पाठवायला हवे होते. कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करून जामीन याचिकेवर गुणवत्तेवर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची विनंती सफदर यांनी न्यायालयाला केली.

कायदा अधिकारी फरहाद अली शाह यांनी याचिकेला विरोध केला आणि युक्तिवाद केला की ट्रायल कोर्टाने इम्रान खान यांचा जामीन फेटाळला आहे. मात्र, खंडपीठाने इम्रान खानच्या अटकपूर्व जामीन अर्जांना पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला. ट्रायल कोर्टाला तुरुंगातून व्हिडिओ लिंकवर याचिकाकर्त्याची हजेरी रेकॉर्ड करण्याचे निर्देश दिले आणि जामीन याचिकांवर गुणवत्तेवर निर्णय घ्या, असे निर्देश दिले.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शहाजहान शेखच्या घराचे कुलूप तोडले

कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!

हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार

श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार

यापूर्वी ११ ऑगस्ट २०२३ रोजी इम्रान खान यांचा ९ मे रोजी झालेल्या दंगलीच्या संदर्भातील सात प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. या प्रकरणांमध्ये लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्यांचा समावेश होता.

Exit mobile version