‘मेक इन इंडिया’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभावशाली परिणाम

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे कौतुकोद्गार

‘मेक इन इंडिया’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभावशाली परिणाम

Russian President Vladimir Putin shakes hands with India's Prime Minister Narendra Modi ahead of their meeting at Hyderabad House in New Delhi, India, October 5, 2018. REUTERS/Adnan Abidi - RC1C6EC7FD10

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे कौतुक केले आहे. भारतात स्थानिक पातळीवर उत्पादने विकसित करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी आणि ‘असेंबल’ करण्यासाठी स्थानिक पातळीवरील कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाते, असे त्यांनी म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खरोखरच प्रभावी परिणाम झाला असल्याचे सांगितले. रशियाच्या ‘एजन्सी फॉर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज’ (एएसआय) तर्फे आयोजित मॉस्को येथील मंचावर पुतिन बोलत होते. रशियन टेलिव्हिजन नेटवर्कने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे उदाहरण देऊन कंपन्यांना स्थानिक पातळीवर उत्पादने विकसित करणे, उत्पादन करणे आणि असेंबल करण्यास कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जाते, याचा ऊहापोह केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

‘भारतातील आमचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘मेक इन इंडिया’ उपक्रम सुरू केला. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खरोखरच प्रभावशाली परिणाम झाला आहे. हा उपक्रम चांगले काम करत आहे. हा उपक्रम आपण सुरू केला नसला तरी, तो आमच्या मित्राने सुरू केला आहे. चांगल्या उपक्रमाचे अनुकरण केल्याने काहीही नुकसान होणार नाही, ’ असे पुतिन यावेळी म्हणाले.

रशियामधील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे उदाहरण देताना व्लादिमीर पुतिन म्हणाले की, आपल्या कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनांची अधिक कार्यक्षमतेने विक्री करण्यास मदत करण्यासाठी साहाय्यक साधने देण्याची गरज आहे. स्थानिक उत्पादन विकसित करण्यासाठी क्षमता वाढवणे आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले. नवीन उत्पादने बनवताना ती सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवण्यासह आधुनिक स्वरूपात सादर करण्यावरही त्यांनी जोर दिला.

हे ही वाचा:

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स

वीरेंद्र सेहवाग म्हणतो, यंदाचा वर्ल्डकप विराटसाठी जिंका!

मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर

जागतिक स्तरावर भारताच्या उत्पादनावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून ‘मेक इन इंडिया’ उपक्रम सप्टेंबर २०१४मध्ये सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश भारताला सर्वाधिक पसंतीचे जागतिक उत्पादन गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन देणे हा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा उद्देश भारताला जागतिक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनवणे, हा आहे. हे साध्य करण्यासाठी, भारत सरकारने व्यवसाय सुलभतेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Exit mobile version