जी-२० मध्ये भारताच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विश्वास

जी-२० मध्ये भारताच्या नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा  विश्वास

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी भारताबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे. जग आर्थिक मंदी आणि अनेक संकटांचा सामना करत आहे पण जी-२० मध्ये भारताच्या नेतृत्वावर आमचा प्रचंड विश्वास आहे, असे क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटलं आहे.

जागतिक सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो असे जॉर्जिव्हा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे. भारताने १ डिसेंबर रोजी औपचारिकपणे जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले. राज्य/सरकार प्रमुखांच्या स्तरावरील जी २० नेत्यांची पुढील शिखर परिषद ९ आणि १०सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यामुळे जॉर्जीव्ह यांनी केलेलं विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी भारताच्या डिजिटायझेशनचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, भारताने सार्वजनिक धोरण आणि खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी एक मजबूत तुलनात्मक लाभ म्हणून देशाने डिजिटायझेशनला कशा प्रकारे गती दिली आहे याचा अनुभव आम्ही घेत आहोत.  प्रत्येक जण कशा प्रकारे जोडल्या जाईल अशा प्रकारच्या डिजिटलीकरणाची सार्वजनिक व्यासपीठावर उभारणी कशी करता येईल आणि ते विकास आणि रोजगाराचे स्रोत कसे ठरू शकेल याला जी २० च्या विविध प्राधान्यापैकी एक प्राधान्य आहे असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या शेजारच्या देशांमधील अस्थिरता, चीनची मंदावलेली आर्थिक गती याचे परिणाम संपूर्ण आशियामध्ये जाणवत आहेत. अशा स्थितीत आशियाच्या विकासावर भारताचा नक्कीच प्रभाव दिसून येत आहे असेही जॉर्जिया यांनी सांगितले. २०२३ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी खूप ‘कठीण’ असणार आहे. जगभरातील देशांसाठी महागाईचा दर कठीण होणार आहे असा इशारा जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवरही मंदीचा थोडाफार परिणाम दिसून येईल, पण हा देश तांत्रिकदृष्ट्या मंदीत जाणार नाही असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version