न्यूजर्सीमधील मशिदीबाहेरील गोळीबारात इमामाचा मृत्यू

न्यूजर्सीमधील मशिदीबाहेरील गोळीबारात इमामाचा मृत्यू

न्यू जर्सी येथील मस्जिद-मुहम्मद-नेवार्क मशिदीबाहेर इमामाची गोळी मारून हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली. हा हिंसाचार कशामुळे झाला आणि इमाम हाच लक्ष्य होता का, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. गोळीबार झाल्यानंतर इमामाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

गोळाबाराचे कारण समजू शकले नसले तरी मशिदीच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन न्यू जर्सीच्या गव्हर्नर फिल मर्फी यांनी दिले आहे. या इमामाचे नाव हसन शरिफ असे आहे. गोळीबार होताच त्यांना तत्काळ जवळच्या विद्यापीठाच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

मस्जिद-मुहम्मद-नेवार्क मशिदीबाहेर सकाळी सहा वाजता शरीफ यांच्यावर गोळीबार करण्यात आला, असे नेवार्कचे सार्वजिनक सुरक्षा विभागाचे संचालक फ्रिट्झ फ्रेज यांनी निवेदनात स्पष्ट केले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू असून सद्यस्थितीत कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे फ्रिट्झ यंनी स्पष्ट केले.

देशातील सर्वात मोठी मुस्लिम नागरी हक्क आणि वकिली संस्था ‘कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स इन न्यू जर्सी’ सध्या या संदर्भात माहिती संकलित करत असून स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तींना प्रोत्साहित करत आहे.

हे ही वाचा:

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

‘मुस्लिम समुदाय पक्षपाताच्या घटना आणि गुन्ह्यांच्या वाढीमुळे चिंतेत असताना मी मुस्लिम समुदाय आणि सर्व धर्माच्या लोकांना हे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सामर्थ्यानुसार सर्व काही करू. सर्व रहिवासी विशेषत: प्रार्थना स्थळांमध्ये आणि जवळच्या परिसरात सुरक्षित आहेत,’ अशी प्रतिक्रिया गव्हर्नर मर्फी यांनी दिली.

Exit mobile version