IFFI ज्युरी प्रमुखांची ‘द काश्मीर फाईल्स’वर टीका, राजदूतांनी मागितली भारताची माफी

राजदूत नाओर गिलॉन यांनी भारताची माफी मागितली आहे.

IFFI ज्युरी प्रमुखांची ‘द काश्मीर फाईल्स’वर टीका, राजदूतांनी मागितली भारताची माफी

गोव्यामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्य ज्यूरी आणि इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर त्यांनी टीका केली. तसेच त्यांनी या चित्रपटाला असभ्य,अश्लील चित्रपट म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राजदूत नाओर गिलॉन यांनी भारताची माफी मागितली आहे. तसेच नादव लॅपिड यांच्या वक्तव्याची आम्हाला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले.

गोव्यात ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) सोमवारी समारोप झाला. महोत्सवाचे प्रमुख नादव लॅपिड यांनी चित्रपटावर टीका केली. नादव लॅपिड म्हणाले, द कश्मीर फाइल्स चित्रपट स्पर्धेत सामील होण्यास पात्र नाही. आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा (प्रोपगंडा) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत, अशी टीका नादव लॅपिड यांनी केली.

नादव लॅपिड यांचा या कार्यक्रमातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यानी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांना माफी मागण्याचा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे. तसेच नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर व्यक्त होण्याची विनंती केली आहे. परंतु, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी काश्मीर फाइल्सवर केलेल्या टीकेवर IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांना एक खुले पत्र लिहिले आहे. ते भारतीयांना समजले पाहिजे, म्हणून मी ते हिब्रू भाषेत लिहित नाही, असे ते म्हणाले. ते नादव लॅपिडवर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भारतीय संस्कृतीत पाहुण्याला देव म्हणतात.

हे ही वाचा : 

‘खोटं बोलण्याच्या स्पर्धेत उद्धव ठाकरेंचा नंबर आला असता’

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाने तब्बल तीनशे कोटींहून अधिक कमाई केली. यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता.

Exit mobile version