‘परिस्थिती बदलली, आता तुम्ही भारतीय नसलात तर अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही’

अमेरिकेच्या राजदूतांचा टोला

‘परिस्थिती बदलली, आता तुम्ही भारतीय नसलात तर अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही’

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी भारतीय आयटी आणि इतर व्यावसायिकांची, अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्वप्नातील नोकऱ्या मिळवणाऱ्या इच्छुकांची प्रशंसा केली. ‘आज अशी परिस्थिती आहे की फॉर्च्युनच्या ५०० कंपन्यांमधील १०पैकी एक सीईओ आता अमेरिकेत शिकलेला भारतीय स्थलांतरित आहे. याआधी तुम्ही भारतीय असल्यास अमेरिकेमध्ये सीईओ होऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. आता गंमत अशी आहे की तुम्ही भारतीय नसल्यास अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही, मग ते गुगल, मायक्रोसॉफ्ट असो किंवा स्टारबक्स. भारतीय लोकांनी येथे येऊन एक मोठा बदल घडवला आहे,’ असे गार्सेट्टी गमतीने म्हणाले.

अमेरिकेच्या विद्यापीठांत सर्व प्रकारचे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. एकट्या २०२३मध्ये, एकूण एक कोटी ४० लाख अमेरिकी व्हिसा भारतीयांना प्रदान करण्यात आला. त्याच्या केवळ एक दिवस आधीच एरिक गार्सेट्टी यांना विचारण्यात आले की, २०२४मध्ये व्हिसा अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे का? तेव्हा त्यांनी दरवर्षी ही संख्या वाढत आहे, असे उत्तर दिले होते.

हे ही वाचा:

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान छत्तीसगडमधून अटक!

२०१५पासून आम आदमी पार्टीने जाहिरातींवर केला १५०० कोटी रुपयांचा खर्च

भाजपाकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केला

‘अमेरिकी विद्यापीठ ही अद्भुत समुदाय, उत्तम संशोधन, अद्भूत विद्याशाखांचे ठिकाण आहे. तरुण पिढीसाठी, वाढत्या लोकसंख्येसाठी, जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येसाठी येथे उत्तमोत्तम पर्याय असल्याने ही प्रगती अशीच पुढेही चालू राहील. मुख्य म्हणजे हा देश अमेरिकेचा मित्र आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे, असे दिसत नाही,’ असे ते म्हणाले.

अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना भारतात अमेरिकी व्हिसासाठी प्रतीक्षा वेळ कमी करण्याची सूचना केली आहे, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोणत्याही देशातील राजदूताला अशी सूचना देण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे राजदूताने सांगितले. अमेरिका व्हिसासाठी भारतात प्रतीक्षा कालावधी २५० दिवस आहे.

Exit mobile version