राजौरीमध्ये हत्याकांडानंतर दहशतवाद्यांचा आयईडी स्फोट

या स्फोटात एका मुलाचा मृत्यू

राजौरीमध्ये हत्याकांडानंतर दहशतवाद्यांचा आयईडी स्फोट

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भागात रविवारी दहशतवाद्यांनी चार हिंदूंची हत्या केली होती. त्याच राजौरीमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. हत्याकांड झाल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटाच्या ठिकाणी आयईडी पेरला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झालेला आहे.

राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात आयईडी स्फोटात एका बालकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावाला भेट देणार आहे. धनगरी गावात काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज पीडितेच्या घराजवळ स्फोट झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी एक संशयित आयईडी सापडला असून तो निकामी केला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धनगरी गावातील हिंदू कुटुंबांना लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ आज राजौरी बंदची हाक देण्यात आली होती.जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला  या भयंकर हल्ल्यात ठार झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि सरकारी नोकरी दिली जाईल. गंभीर जखमींना एक लाखाची मदत दिली जाणार असल्याचे सिन्हा यांनी  सांगितलं

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

श्रीनगरमध्ये रविवारी रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. ही घटना श्रीनगरमधील एमके चौकातील घडली आहे. परंतु ग्रेनेडचे लक्ष्य चुकले आणि त्यात एक स्थानिक मुलगा जखमी झाला. गुन्हेगाराला पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version