इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले असून लवकरात लवकर इस्रायल सैन्यदलाला युद्ध थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे. या वेळी इस्रायलनेही आपली बाजू मांडून दक्षिण आफ्रिकेचे आरोप खोडून काढले. युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इस्रायलने कोणत्याही आंतरराष्ट्रीय तपाससंस्थेपुढे आपला पक्ष मांडला आहे. इस्रायलने याआधीपर्यंत सर्व चौकशांना अनुचित आणि पक्षपाती ठरवले आहे.
आफ्रिका आणि इस्रायलने मांडली बाजू
आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे वकील अदिला हासिम यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी गेल्या १३ महिन्यांत पुरावे सादर केल्याचे सांगितले. गाझामधील लोक पीडित असून त्यांचे दुःख न्यायालयच रोखू शकते, असे ते म्हणाले. सुनावणीदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्हिडीओच्या माध्यमातून स्वतःची बाजू मांडली. त्यात त्यांनी ही तर उलटी गंगा वाहात असल्याचे सांगत इस्रायलवरील आरोप फेटाळून लावले. इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला जात आहे, उलट आमचा देश नरसंहाराशी लढत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक
जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान
‘अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता’
इंडिया गटाला धक्का; जागावाटपाबाबत काँग्रेसशी चर्चा करण्यास तृणमूलचा नकार
अमेरिकेचे मौन
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लियोर हयात यांनी सुनावणीनंतर ट्विट करून दक्षिण आफ्रिकेने न्यायालयात सादर केलेले प्रकरण थोतांड असल्याची टीका केली. न्यायालयात दक्षिण आफ्रिकेचे कायदेशीर पथक हमासचे प्रतिनिधी म्हणून बाजू मांडत होते, असा आरोप करत दक्षिण आफ्रिकेचे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे स्पष्ट केले. तर, अमेरिकेने न्यायालयीन कारवाईवर कोणतेही मत व्यक्त करण्यास नकार दिला. तर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले.