दुबई येथे सुरू असलेला आयसीसी टी-२० पुरुष क्रिकेट विश्वचषक हा अतिशय रोमांचक टप्प्यावर सुरू आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणारे चार संघ अजून निश्चित झालेले नसून आज आणि उद्या होणाऱ्या सामन्यांकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ फेरीतील ब गटातून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होणार यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सुपर १२ फेरीच्या ब गटात अव्वल स्थानी असलेला पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत दाखल झाला असून त्याच्या जोडीला न्युझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत या तीन संघांपैकी नेमके कोण असणार यासाठी अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहेत.
तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून न्युझीलंडचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे या स्पर्धेचे समीकरण हे अफगाणिस्तान विरुद्ध न्युझीलंड या सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात जर अफगाणिस्थानने न्युझीलंड संघाचा पराभव केला तर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघांचे तीन तीन विजयासह सहा गुण होतील. या फेरीतील अंतिम सामना भारताचा नामिबिया या कमजोर संघासोबत होणार आहेत. या सामन्यात भारत विजयी झाला तर तिन्ही संघांचे सहा गुण होऊन अंतिम निर्णय हा धावगतीवर ठरणार आहे.
हे ही वाचा:
बुलढाणा पतसंस्थेत सापडलेले ते ५३.७२ कोटी कोणाचे?
महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे
ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?
अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
त्यामुळे अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्यात अफगाणिस्तानचा विजय व्हावा यासाठी भारतीय क्रिकेट चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. या सामन्यात जर न्यूझीलंडचा संघ विजयी झाला तर या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात येणार आहे.
सध्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू असून अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाची सुरुवात अडखळत झाली असली तरीदेखील नजीबुल्लाहच्या धुवाधार अर्धशतकी खेळीमुळे अफगाणिस्तान संघाने धावफलकावर १२४ धावा चढवल्या आहेत. नजीबुल्लाहने तुफान फटकेबाजी करताना ४७ चेंडूत ७३ धावांची खेळी केली आहे. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या खेळीच्या जीवावर अफगाणिस्थान संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचे आव्हान ठेवले आहे. तेव्हा हे आव्हान न्यूझीलंडचा संघ वीस षटकांत साध्य करू शकतो का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. अफगाणिस्तान संघाची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे न्यूझीलंडला रोखण्यासाठी व शर्थीचे प्रयत्न करणार यात शंकाच नाही.