टी-२० क्रिकेटचा विश्वविजेता होण्यासाठी आजपासून घमासान

टी-२० क्रिकेटचा विश्वविजेता होण्यासाठी आजपासून घमासान

आजपासून आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषकाचे धुमशान सुरू होत आहे. युएई इथे हा विश्वचषक पार पडत असून आजपासून या स्पर्धेची साखळी फेरी सुरु होत आहे. आजपासून म्हणजेच १७ ऑक्टोबर पासून १४ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच तब्बल पुढच्या महिनाभराच्या कालावधीत हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. सुरुवातीला हा विश्वचषक भारतात खेळवला जाणारा होता. पण कोविड महामारीच्या कारणास्तव या स्पर्धेचे ठिकाण बदलून आता दुबई आणि ओमान या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जात आहे.

ही स्पर्धा दोन भागांमध्ये खेळली जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या भागात साखळी सामने रंगणार आहेत ज्यामध्ये आठ संघ भिडणार आहेत. ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी हे चार संघ एका गटात असणार आहेत. तर आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया हे चार संघ दुसऱ्या गटात असणार आहेत. या दोन्ही गटातून प्रत्येकी दोन दोन असे चार संघ पुढल्या फेरीत म्हणजेच ‘सुपर १२’ मध्ये सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा:

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

पवारसाहेब किती हा भाबडेपणा?

‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’

‘स्वच्छता कामगारांसाठी बांधलेल्या घरांमध्ये १८४४ कोटींचा घोटाळा’

जगभरातील सर्वोत्तम आठ क्रिकेट संघ हे सुपर १२ फेरीत थेट दाखल झाले आहेत. या फेरीतही दोन गट असणार आहेत. ज्यामध्ये पहिल्या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज या संघांचा समावेश आहे. तर साखळी सामन्यातून पात्र झालेले दोन संघ हे या गटाचा भाग असतील. तर दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ आहेत. तर साखळी सामन्यातून पात्र झालेले उर्वरित दोन संघ हे या गटात समाविष्ट करण्यात येतील.

जगभर या स्पर्धेची उत्सुकता लागली असून टी-२० क्रिकेटमधील नवीन विश्वविजेता कोण होणार? या कडे साऱ्या जगाचे लक्ष्य लागले आहे. तर भारतीय क्रिकेट रसिकही आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Exit mobile version