भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज देशातील पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ सामील झाले आहे. लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी हवाई दलात दाखल झाली आहे. हेलिकॉप्टरच्या या ताफ्यामुळे भारतीय सैन्याची ताकद तर वाढेलच, शिवाय पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील शत्रूचा नायनाटही करता येईल. राजस्थानमधील जोधपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील करण्यात आली आहे.
एलसीएच हेलिकॉप्टर वायूदलाच्या ताफ्यात सामील झाले आहे. जोधपुर एयरबेसवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. पहिल्या तुकडीत दहा लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर सैन्य दलात करण्यात येणार आहे. या अटॅक हेलिकॉप्टरमध्ये शत्रूवर अचूक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. हेलिकॉप्टर सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले आहे. हे हेलिकॉप्टर सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लडाख आणि वाळवंटी प्रदेशात तैनात केले जाणार आहेत.
#AtmaNirbharBharat#IAF will formally welcome the Light Combat Helicopter on 03 October 2022.
Watch the induction ceremony LIVE here on our handle, DD National and DD Rajasthan YouTube channels from 1100 Hr onwards. pic.twitter.com/qSWHjXqZIB
— Indian Air Force (@IAF_MCC) October 2, 2022
हे ही वाचा:
दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू
नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी
‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?
‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
- हेलिकॉप्टर इतर लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत वजनाने हलके आहे. या हेलिकॉप्टरचे वजन सुमारे ५.८ टन आहे.
- कमी वजनामुळे हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रं आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. तसेच रात्रीच्या वेळी हल्ले करण्याची क्षमता आहे.
- हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या काही वैशिष्ट्यांमुळे ते सहजासहजी शत्रूच्या रडारवर येणार नाही.
- कॉकपिटची सर्व वैशिष्ट्य पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले करण्यात आली आहेत.
- हेलिकॉप्टर्स उंचावरील भागात तैनात करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- या पंधरा हेलिकॉप्टर्सपैकी दहा भारतीय हवाई दलासाठी आहेत आणि पाच लष्करासाठी आहेत.