सिंगापूरमधूनही ऑक्सिजनचे टँकर्स

सिंगापूरमधूनही ऑक्सिजनचे टँकर्स

भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, तर त्याबरोबरच तो ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या टँकरचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारताला जगाभरातून मदत मिळत आहे. जर्मनी पाठोपाठ आता सिंगापूरवरून देखील हवाई दलाच्या सहाय्याने ऑक्सिजन वहनासाठी आवश्यक असलेले टँकर्स आणले जाणार आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांची चौकशी करावी

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमकडा कोसळला

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

सिंगापूरवरून चार क्रायोजेनिक टँकर हवाई दलाच्या सी-१७ या विमानाच्या सहाय्याने आणले जाणार आहेत. आज (शनिवारी) सकाळी सिंगापूरच्या चँगी विमानतळावर हवाई दलाचे विमान उतरले. या विमानात चार द्रवरूप ऑक्सिजनसाठी आवश्यक असलेले क्रायोजेनिक टँकर विमानात भरले जात आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या बाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

 

 

या ट्वीटमध्ये टँकर विमानात चढवले जात असतानाच व्हिडिओ टाकण्यात आला आहे. त्याबरोबरच चार ऑक्सिजन टँकर सोबत हे विमान पश्चिम बंगालच्या पनागढ़ येथे येण्यासाठी निघाले असल्याचे देखील सांगितले आहे.

यापूर्वी हवाई दलाने जर्मनी मधून ऑक्सिजन निर्मीतीचे प्लँट आणण्यासाठी देखील सहाय्य केले. त्याबरोबरच रिकाम्या टँकर्सची देशांतर्गत वाहतूक करायला देखील हवाई दलाने सुरूवात केली आहे. त्यामुळे ते टँकर ऑक्सिजन निर्मितीच्या कारखान्यापर्यंत लवकरात लवकर जाऊन अधिकाधीक वेगाने ऑक्सिजन उपलब्ध करून देऊ शकतील.

Exit mobile version