माझा कोणावरही विश्वास नाही

माझा कोणावरही विश्वास नाही

“माझा कोणावरही विश्वास नाही. माझा तुमच्यावरही विश्वास नाही.” असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केले आहे. पत्रकारांनी जेंव्हा असा प्रश्न केला की, “तुमचा तालिबानवर विश्वास आहे का?” यावर बायडन यांनी हे उत्तर दिले.

“तालिबानला काही मूलभूत निर्णय घ्यावे लागतील. सर्व अफगाण जनतेला एकत्र आणून त्यांच्या सुख समृद्धीची जवाबदारीही घ्यावी लागेल.” असंही बायडन यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तान प्रश्नावर आपली भूमिका जाहीर केली आहे. अमेरिकेने आपल्या आजवरच्या सर्वात मोठा युद्धाला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले. माझ्या या निर्णयावर प्रचंड टीका होईल पण ती मी सहन करेन असे बायडन यांनी सांगितले.

बायडन यांनी सत्तारूढ झाल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळेच अफगाणिस्तान मधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका देखील होताना दिसत आहे. यावर देखील बायडन यांनी भाष्य केले असून ‘ही टीका सहन करायची माझी तयारी आहे’ असे ते म्हणाले.

वीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा अफगाणिस्थान मध्ये दाखल झालो तेव्हा आमचे ध्येय स्पष्ट होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी आमच्यावर ज्यांनी हल्ला केला ते आम्हाला हवे होते आणि अल कायदाने आमच्यावर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये असे आम्हाला वाटत होते. आम्ही हे दशकभरापूर्वीच साध्य केले आहे. अफगाणिस्तानची राष्ट्रनिर्मिती हे आमचे मिशन कधीच नव्हते.

हे ही वाचा:

तालिबानचे हजारो दहशतवादी लवकरच पंजशीरमध्ये जाणार?

पंजशीर विरुद्ध तालिबान

आता चिंता अफगाणिस्तानातून युरोपात होणाऱ्या स्थलांतराची

मध्य रेल्वे बांधणार १३ पादचारी पूल नव्याने

आत्ता जी परिस्थिती आपण पाहत आहोत ती बघता हे खेदाने नमूद करावेसे वाटते की कितीही मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैन्य पाठवले तरीही स्थिर, एकसंध आणि सुरक्षित अफगाणिस्तानची निर्मिती करणे शक्य नाही. आज जे घडत आहे तेच पाच वर्षांपूर्वी किंवा पंधरा वर्षांनंतर घडले असते.

Exit mobile version