30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियाहैदराबादच्या तरुणीची लंडनमध्ये ब्राझिलियन व्यक्तीकडून घरातच हत्या 

हैदराबादच्या तरुणीची लंडनमध्ये ब्राझिलियन व्यक्तीकडून घरातच हत्या 

तिच्या लग्नाचा विचार घरच्यांकडून सुरू होता, त्याआधीच ही दुर्दैवी बातमी आली

Google News Follow

Related

एका २७ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणीची भोसकून हत्या केल्याची घटना उत्तर लंडनमध्ये घडली. या हत्येप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती बुधवारी स्कॉटलंड यार्डने दिली. ही घटना वेंबलीमधील नील्ड क्रिसेंट या निवासी भागात घडली. एका ब्राझिलियन व्यक्तीने तिच्या घरातच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. ब्रिटनच्या पोलिसांनी अधिकृतरीत्या या तरुणीचे नाव जाहीर केले नसले तरी भारतातील वृत्तानुसार, या तरुणीचे नाव कोंथम तेजस्विनी असून ती मूळ हैदराबादची आहे. यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. या ब्राझिलच्या व्यक्तीचे नाव डी मोराइस असे असून तेजस्विनीच्या खोलीतच तो भाड्याने राहण्यासाठी आठवड्याभरापूर्वी आल्याचे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

समान नागरी कायद्यासाठी सर्वसामान्यांकडून मागवणार अभिप्राय

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

संजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

राहुल गांधींसह कर्नाटकच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा समन्स

शवविच्छेदनानंतरच पोलिस तिची ओळख अधिकृतरित्या जाहीर करतील, असे समजते. स्थानिक वेळेनुसार, मंगळवारी सकाळी १० वाजता पोलिसांना या घटनेसंबंधी फोन आला होता. ‘आम्हाला आज सकाळी या घटनेबाबत समजले. ही घटना नेमकी कधी घडली, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. तिची प्रकृती चिंताजनक असून ती रुग्णालयात आहे, असे आम्हाला सांगण्यात आले होते,’ असे तेजस्विनीच्या वडिलांनी बुधवारी भारतातील एका वृत्तवाहिनीला सांगितले. कोंथम ही तरुणी तीन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. तिथे तिने एमएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ती गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच हैदराबादला आली होती. त्यानंतर पुढच्याच महिन्यात ती लंडनला गेली. या वर्षी मे महिन्यात ती पुन्हा येथे येणार होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.

 

‘आम्ही तिच्या विवाहाचा विचार करत होतो. याबाबत अंतिम बोलणी झाल्यानंतर ती परतणार होती. तिने तिच्या तात्पुरत्या नोकरीचा राजीनामाही दिला होता. आणखी एक महिना काम केल्यानंतर ती परतणार होती,’ असे तिच्या वडिलांनी सांगितले. तिचा मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती व्यवस्था करावी, अशी विनंती तिच्या काकांनी केली आहे. नील्ड क्रिसेंट येथील हत्येच्या ठिकाणाच्या जवळील हॅरो भागातून एका २३ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

 

सकाळी १० च्या सुमारास हा हल्ला झाला. त्यात आणखी एका महिलेवरही हल्ला करण्यात आला पण ती बचावली आहे. तिच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही, असे डॉक्टरानी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा