चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपिन्समधील मृ्त्युचे तांडव

९८ ठार, ६३ बेपत्ता

चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपिन्समधील मृ्त्युचे तांडव

फिलिपिन्सला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आठवड्याच्या शेवटी आलेल्या विनाशकारी उष्णकटिबंधीय वादळात किमान ९८ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशातील अनेक भागात पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सरकारने सोमवारी ही माहिती दिली.

वादळ शमल्यानंतर, पूर आणि ताज्या भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशाच्या आपत्ती संस्थेने ही माहिती दिली आहे. मिमारोपा, बिकोल प्रदेश, वेस्टर्न व्हिसायास, जांबोआंगा प्रायद्वीप, दक्षिण कोटाबाटो, सुलतान कुदरत, सारंगानी आणि जनरल सॅंटोस सिटी या भागांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

दक्षिण फिलिपिन्समधील बांगसामोरो स्वायत्त प्रदेश मुस्लिम मिंडानाओमध्ये ५३ मृत्यू झाले. त्याच वेळी, मध्य फिलिपिन्समधील मुख्य लुझोन बेटाच्या नऊ भागात आणि दक्षिण फिलिपिन्समधील मिंडानाओ बेटाच्या इतर भागात इतर मृत्यू झाले आहेत. वादळामुळे ३६४ रस्ते आणि ८२ पुलांचे नुकसान झाले आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version