थायलंडमधील एका गावात जंगली माकडांचे टोळकी दहशत माजवत आहेत. बँकॉकच्या उत्तरेस सुमारे ९० मैलांवर असलेले लोपबुरी हे शहर माकडांच्या लोकसंख्येसाठी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. माकडांच्या शेकडोच्या संख्येने तेथील रस्त्यावर धुमाकूळ घातला आहे.
कोरोना महामारीत मार्च २०२० पासून थायलंडमध्ये लॉकडाऊन लागले. आणि अचानक लोपबुरीतील पर्यटन बंद झाले. याचा परिणाम मकाक माकडांच्या प्रजातीवर झाला. कारण पर्यटन बंद झाल्यामुळे त्यांना खायला मिळणे बंद झाले. अन्नाच्या कमतरतेमुळे माकडे हिंसक बनली.
अचानक माकडांची संख्या कशी वाढली
महामारीच्या काळात पर्यटन बंदीमुळे स्थानिकांनी माकडांना स्वस्थातले साखरयुक्त पदार्थ, केळी खायला दिली. साखरयुक्त आहारामुळे आणि केळीचे जास्त सेवन केल्यामुळे ते अतिक्रियाशील आणि प्रजननासाठी अधिक उत्सुक झाले. म्हणून अचानक तिथली माकडांची लोकसंख्या वाढायला लागली आहे. स्थानिकांनी आता माकडांना साखरयुक्त पदार्थ देणे बंद केले आहे. त्यामुळे ही प्रजात दुकानांवर, लोकांवर, लोकांच्या गाड्यांवर आक्रमण करत आहेत.
नोव्हेंबरमध्ये कोरोनाव्हायरस निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटक थायलंडला परत येऊ लागले आहेत. मात्र माकडांची संख्या इतकी वाढली आहे की, पर्यटक लोपबुरीला पर्यटन करायचे टाळत आहेत.
हे ही वाचा:
पंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे
भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!
कोरोना काळात आयातीला ‘सोन्याचे दिवस’
लॉकडाऊनमुळे मकाकांना शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मुक्तपणे फिरण्यासाठी आणखी जागा मिळाली. तसेच शहरातील बेबंद मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली. परंतु कालांतराने, ते अधिक धाडसी झाले आहेत त्यांनी दुकाने, रेस्टॉरंट, सिनेमा आणि शाळा यासारख्या सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांच्या टोळ्यांनी परिसर व्यापला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी अलिकडे वन्य माकडांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, प्राण्यांची संख्या वाढत असल्याने संख्या आटोक्यात आणण्यात ते अक्षम आहेत.