30 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियागेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बळी पडलेल्यांचे मृतदेह अजूनही शवागारात

गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बळी पडलेल्यांचे मृतदेह अजूनही शवागारात

Google News Follow

Related

भारतात कोविडचा कहर झालेला असताना, काही शहरात कोविडने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी रुग्णांना दहन होण्यासाठी वाट पहावी लागली होती. परंतु अमेरिकेतील परिस्थिती यापेक्षा भयानक असल्याचे उघड झाले आहे. तिथे गेल्यावर्षी मरण पावलेल्यांचे अजूनही दफन झालेले नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह अजूनही रेफ्रिजरेटेड ट्रक्समध्ये पडून आहेत.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी जेव्हा न्यूयॉर्क कोविडचे केंद्र झाले होते. त्यावेळेस शहरातील मृतदेहांना रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हापासून अजूनपर्यंत हे मृतदेह तात्पुरत्या शवागरात सनसेट पार्कमधील ३९th Street Pier वर आहेत. शहराच्या आरोग्य विभागाला दिलेल्या अहवालात मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने कबुल केले की अजूनही सुमारे ७५० कोविड-१९ रुग्णांचे मृतदेह दफन होण्याची वाट बघत या शवागरात पडून आहेत.

हे ही वाचा:

क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली

७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा

आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल

मुंबईला मिळणार  ३०० ‘सुपर सेव्हर्स’ 

याबाबत सरकारी पातळीवरून या रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा चालू आहे. त्यांनी हे मृतदेह दफन करण्यासाठी हार्ट बेटाची निवड केली, तर त्या मृतदेहाना त्या ठिकाणी पुरण्यात येणार आहे.

भारतातील कोविड कहरात काही शहरांत स्मशान भूमींवर देखील प्रचंड ताण आला होता. त्यावेळी एकाच ठिकाणी अनेक चिता जळताना दिसत होत्या. त्याच्या आधाराने जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न काही जागतिक दर्जाच्या माध्यमांद्वारे झाला त्याबरोबरच भारतातील काही माध्यमांनी देखील केला. वॉशिंग्टन पोस्टचे हे वृत्त त्यांच्यासाठी नक्कीच चपराक ठरले असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा