म्यानमारमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने (GFZ) सांगितले की म्यानमारमध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल म्यानमारकडून तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर्मनीच्या जीएफझेड भूगर्भीय केंद्राने सांगितले की, हा भूकंप दुपारी १० किलोमीटर खोलीवर झाला. दरम्यान, म्यानमार हा जगातील सर्वात भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे.
म्यानमार अग्निशमन सेवा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही शोध सुरू केला आहे आणि जीवितहानी आणि नुकसानीची तपासणी करण्यासाठी यांगूनमध्ये फिरत आहोत. सध्या आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. यांगूनमधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शहरातील अनेक लोक जीव वाचवण्यासाठी इमारतींमधून बाहेर पळाले.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप आल्याने बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर सुमारे ३० जण अजूनही अडकले असल्याची माहिती आहे. इमारत कोसळताचे व्हिडीओ समोर आले आहेत. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेले लोक ओरडत पळून जात असताना व्हिडीओमध्ये दिसले.
म्यानमारमध्ये, एक मशीद अर्धवट कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. म्यानमारच्या मंडाले येथील प्रतिष्ठित ‘अवा पूल’ देखील मोठ्या भूकंपामुळे इरावती नदीत कोसळला. बँकॉकमध्ये अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आणि व्यवसाय दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आले. सरकारने मेट्रो सेवा, विमानतळ आणि सबवे बंद केले आहेत.
हे ही वाचा :
“आरोग्यासाठी वरदान आहे त्रिफळा, पचनशक्तीपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत लाभदायक”
उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का?
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरन आघाडीवर
‘पूरनसोबत फलंदाजी करणे रोमांचक’ : मार्श
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि दोन्ही सरकारांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल मला चिंता आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे”, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.