चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनचा अग्नेयकडील म्हणजेच दक्षिण पूर्वेकडील प्रांत फुजिआनमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाचा हा संसर्ग २१ दिवसांच्या क्वारंटाईन काळ पूर्ण केलेल्या व्यक्तीमुळे सर्वाधिक पसरला आहे.
चीनमध्ये कोरोनाचे अतिशय कडक नियम लागू आहेत, मात्र असं असतानाही कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे आता चिनी प्रशासनाची भांबेरी उडाली आहे. चिनी माध्यमांच्या माहितीनुसार, एक चिनी नागरिक काही दिवसांपूर्वी परदेशातून चीनमध्ये परतला. आणि तो खूप लोकांना भेटला. आणि त्यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला. विशेष गोष्ट म्हणजे, या चिनी नागरिकांने २१ दिवसांचा क्वारंटाईन काळ तर पूर्ण केला होताच, शिवाय याची कोरोना टेस्ट ९ वेळा निगेटीव्ह आली.
दरम्यान, चीनच्या फुजिआन प्रांतात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याचा मुलगा तिथेच स्थानिक शाळेत होता. या मुलाद्वारे शाळेतील तब्बल १५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, फुजिआन प्रांतात ६० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. एका माहितीनुसार, या मुलाचे वडील काहींच दिवसांपूर्वी सिंगापूरहून भारतात आले होते. परत आल्यानंतर त्यांनी नियमानुसार, २१ दिवसांचा क्वारंटाईन काळही पूर्ण केला होता.
हे ही वाचा:
५ जी स्पेक्ट्रममध्ये मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
फ्रान्सने आयएसआयएस प्रमुखाला संपवले
अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या
पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!
४ ऑगस्टला हा व्यक्ती शियामेन शहरात दाखल झाला, जे फुजियान प्रांतातील सर्वात मोठं किनारपट्टीचं शहर आहे. इथं या व्यक्तीने १४ दिवस हॉटेलमध्ये स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं. यानंतर ७ दिवस एका रुग्णालयात हा व्यक्ती क्वारंटाईन झाला. पुतियान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, क्वारंटाईनमध्ये या व्यक्तीच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. तब्बल ९ वेळा क्वारंटाईन काळात कोरोना टेस्ट करण्यात आल्या. मात्र सगळ्या टेस्ट निगेटीव्हच आल्या. मात्र मागील आठवड्यात हा व्यक्ती पॉझिटीव्ह सापडला. तब्बल ३७ दिवसांनंतर या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली.