24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाभारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण

भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण

हौथीच्या दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने जहाजावरील कर्मचाऱ्यांना धाक दाखवला

Google News Follow

Related

भारताकडे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक जहाजाचे येमेनच्या हौथी दहशतवाद्यांनी दक्षिण लाल समुद्रातून अपहरण केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. ‘हा इराणचा दहशतवाद असून जागतिक पातळीवरील अतिशय गंभीर घटना आहे,’असेही इस्रायलने म्हटले आहे.

ब्रिटिशांच्या मालकीच्या आणि जपानी कंपनीकडून चालवल्या जाणाऱ्या या मालवाहतूक जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी सांगितले. या जहाजावर एकही इस्रायली नागरिक नव्हता.
हौथी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी इस्रायलचे जहाज अपहृत केल्याचा दावा केला आहे. मात्र इस्रायल सरकारने तो फेटाळून लावला आहे. हे जहाज येमेनी बंदरावर नेण्यात आले असल्याचे हौथी दहशतवाद्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही जहाजावरील कर्मचाऱ्यांना इस्लामिक मूल्ये आणि त्तत्त्वांनुसार वागणूक देत आहोत, असे हौथीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. हौथीच्या दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने जहाजावरील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून या जहाजाचे अपहरण केले. या मालवाहतूक जहाजात युक्रेनियन, बल्गेरियन, फिलिपिनो आणि मेक्सिकन आदी वेगवेगळ्या देशांचे २५ कर्मचारी आहेत. इस्रायल कंपनीच्या मालकीच्या असणाऱी किंवा त्यांच्याकडून चालवली जाणाऱी किंवा इस्रायलचा झेंडा असणारी जहाजे आमचे लक्ष्य असतील, येमेन इराणशी संबंधित असणाऱ्या हौथी दहशतवादी गटाने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या कोणत्याही जहाजावर कोणत्या देशाचे नागरिक काम करत असतील, तर त्याला माघारी बोलवावे, असे आवाहन त्यांनी देशांना केले आहे.

हे ही वाचा:

मेट्रो बांधकाम साइटजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

ओलिसांच्या सुटकेच्या अटीवर इस्रायल-हमासदरम्यान पाच दिवसांचा युद्धविराम

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनीही या गॅलक्सी नावाच्या मालवाहू जहाजाचे हेलिकॉप्टरच्या साह्याने अपहरण झाल्याचे स्पष्ट केले आहे. आठवड्याभरापूर्वीच हौथी गटाच्या म्होरक्याने इस्रायल आणि इस्रायल जहाजांवरील हल्ले वाढवले जातील, असे जाहीर केले होते.

 

हौथी ही झैदी शिया मुस्लिम चळवळ असून तिचा उदय १९९०च्या सुमारास उत्तर येमेनमध्ये झाला. त्यांचा सुन्नी नेतृत्वाखालील सरकारला विरोध आहे. त्यांनी सन २००४पासून आतापर्यंत येमेनी सरकारविरोधात सहा युद्धे छेडली आहेत. सन २०१४पासून त्यांनी साना या राजधानी शहरावर ताबा मिळवला असून सरकारला अज्ञातवासात ढकलले आहे. त्या दिवसापासून ते सौदी नेतृत्वाखालील सुन्नीच्या नेतृत्वाखालील सुन्नी अरब राष्ट्रांशी लढत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा