अब आया है उंट हॉटेल के अंदर!

अब आया है उंट हॉटेल के अंदर!

सौदी अरेबियात सध्या उंटांसाठी एक सर्व सुखसोईंनी समृद्ध असे हॉटेल उभारण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये उंटांना गरम दूध तसेच इतर अनेक सुविध दिल्या जातात. सहाव्या किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिव्हल दरम्यान उंटांची सेवा करण्यासाठी म्हणून समर्पित असलेले जगातील पहिले उंट हॉटेलचे अनावरण केले.

हॉटेलला ‘टेटामन’ (रेस्ट ऍश्य्युअर्ड) असे म्हणतात. यामध्ये तब्बल १२० खोल्या आहेत. यामध्ये उंटांसाठी विविध सेवा दिल्या जातात. खाणे, पिणे, त्यांची काळजी घेणे, लक्ष ठेवणे अशा सर्व सुविधा दिल्या जातात. यासाठी हॉटेलमध्ये ५० हून अधिक कर्मचारी काम करत असल्याचे सौदी कॅमल क्लबचे प्रवक्ते मोहम्मद अल हरबी म्हणाले.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

आज १२ आमदारांना निलंबित केले, उद्या १२० जणांना कराल!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक

हॉटेल आपल्या अतिथी उंटांसाठी जेवण, गरम दूध, त्यांच्यासाठी स्वच्छ आणि उबदार जागा अशा स्वरूपाची पंचतारांकित सेवा देत असल्याचेही ते म्हणाले. सध्या या हॉटेलमध्ये उंटांसाठी प्रति रात्र सुमारे शंभर डॉलर आकारण्यात येत आहे. उंट मालक आणि क्लबच्या अधिकाऱ्यांसाठी हॉटेलची कल्पना अद्भुत आणि आरामदायक आहे, असे मत मोहम्मद अल हरबी यांनी व्यक्त केले आहे.

उंट महोत्सव हा १ डिसेंबरपासून रियाधमध्ये सुरू झाला असून ४० दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात आखाती, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि रशियामधील उंट मालक आणि उत्साही एकत्र आले आहेत.

Exit mobile version