पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

पाकिस्तानमध्ये तालिबानी प्रकार पाहायला मिळाला आहे. एका गटाने एका किशोरवयीन मुलासह चार महिलांना नग्न केले. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात दुकानात चोरी केल्याचा आरोप करून त्यांना ओढले आणि मारहाण केली. सोमवारी लाहोरपासून १८० किलोमीटर अंतरावर फैसलाबादमध्ये ही घटना घडली.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका युवकासह चार महिला आजूबाजूच्या लोकांना विनवणी करताना दिसल्या होत्या की, कपडे काढून टाकल्यानंतर त्यांना झाकण्यासाठी कपड्याचा तुकडा द्या, पण त्यांना काठीने मारहाण करण्यात आली.

प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार आयेशा सिद्दीकी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये महिला रडताना दिसल्या आणि लोकांना जाऊ द्या अशी विनंती करत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तासभर रस्त्यावर नग्नावस्थेत त्यांची परेड करण्यात आली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, “आम्ही या दुर्दैवी घटनेतील पाच मुख्य गुन्हेगारांना अटक केली आहे.” पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यात सहभागी असलेल्या सर्वांना न्याय मिळवून दिला जाईल. असे ते म्हणाले.

कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पाच संशयित आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणानुसार, पीडितेने सांगितले की, ते फैसलाबादमधील बावा चक मार्केटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेले होते.

“आम्हाला तहान लागली होती आणि उस्मान इलेक्ट्रिक स्टोअरच्या आत गेलो आणि पाण्याची बाटली मागितली. पण त्याचा मालक सद्दाम याने आमच्यावर चोरीच्या उद्देशाने दुकानात प्रवेश केल्याचा आरोप केला. सद्दाम आणि इतर लोकांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी कपडे काढले, ओढले आणि मारहाण केली. आम्हाला बाजारातून त्यांनी विवस्त्र केल्यानंतर आमचे व्हिडिओही बनवले. हा अत्याचार थांबवण्यासाठी जमावातील कोणीही गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.” असे तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

इम्रान खानच्या ‘नया पाकिस्तान’ची ही दशा

जागतिक सरासरीपेक्षा भारतात १०% जास्त महिला वैमानिक

फैसलाबादचे पोलिस प्रमुख डॉ. आबिद खान यांनी सांगितले की, सद्दामसह पाच मुख्य गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, तर पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

Exit mobile version