केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी त्रिपुरा दौऱ्यावर होते. येथे झालेल्या भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी राम मंदिराबाबत मोठी घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत मंदिर तयार होईल अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे. त्रिपुरातील लोकांना तिकीट बुक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
केवळ राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊद्यात माता त्रिपुर सुंदरीचे मंदिर देखील असेच भव्य उभारण्यात येईल. सारे जग बघत बसेल. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर बनवला, महाकालचा कॉरिडॉर बनवला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनवले जात आहे. माता विंध्यवासिनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले.
दक्षिण त्रिपुरामध्ये एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, ‘काँग्रेसने राम मंदिराच्या उभारणीत न्यायालयात अडथळे आणले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मोदीजींनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन करून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन खरपूस समाचार घेतला. अमित शाह म्हणाले , २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा अध्यक्ष होतो आणि राहुल बाबा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे मंदिर वहीं बनाएंगे तिथि नहीं बताएंगे. तर राहुल बाबा, उघड्या कानांनी ऐका, १ जानेवारी २०२४ ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार होईल असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी, अयोध्येतील जमीन जिथे एकेकाळी बाबरी मशीद उभी होती ती राम लल्लाची होती असा सर्वानुमते निर्णय दिल . या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी केली होती आणि तेव्हापासून मंदिराचे बांधकाम सुरू आहे.