25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरदेश दुनियातालिबानने भारत विरोधी लढ्याला मदत करावी: -सय्यद सलाहुद्दीन

तालिबानने भारत विरोधी लढ्याला मदत करावी: -सय्यद सलाहुद्दीन

Google News Follow

Related

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन याने तालिबानला भारत विरोधी मोर्चा उघडायला सांगितले आहे. सलाउद्दीन याने एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तालिबानला फूस लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही ऑडिओ क्लिप सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तालिबानच्या आडून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये दहशतवादी कुरबुरी सुरु करायचा हिजबूलचा डाव समोर आला आहे.

इंटरनेटवर पोस्ट करण्यात आलेल्या या ऑडिओ क्लिप मध्ये सय्यद सलाहुद्दीन हा जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी तालिबानने मदत करावी असे सांगताना दिसत आहे. यामध्ये तो तालिबानी राजवटीला शुभेच्छा देत आहे. मी अल्लाहकडे दुवा मांगतो की त्यांनी अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीला शक्ती द्यावी, जेणेकरून ते भारता विरुद्धच्या काश्मीरी लोकांच्या लढ्याला मदत करतील.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

परमबीर सिंग, सचिन वाझे विरोधात खंडणीचा गुन्हा

सय्यद सलाहुद्दीनच्या या आवाहनाला तालिबानी अतिरेकी नेमका कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पूर्वी तालिबानच्या प्रतिनिधिंनी अनेकदा आपण इतर देशाच्या नागरिकांना त्रास देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भारतीय नागरिकांनाही आम्ही कोणत्याही पद्धतीचा त्रास देणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तर भारत सरकारने आपला काबुल मधील दूतावास चालू ठेवावा आम्ही त्यांना संरक्षण देऊ असे देखील तालिबानकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आता तालिबान भारत विरोधी भूमिका घेणार का? असा सवाल उपस्थित होतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा