जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

संपूर्ण जगात पडसाद उमटलेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने या खटल्यात जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवले.

गेल्यावर्षी २५ मे रोजी पोलीस अधिकाऱ्याच्या अमानुष वागणुकीमुळे जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉईड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याची मान गुडघ्याने दाबून ठेवली होती. त्यामुळे जॉर्ज फ्लॉईड यांना श्वास घेता आला नाही. वारंवार विनवण्या करूनही डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याने शेवटपर्यंत त्यांच्या मानेवरून पाय हटवला नाही. त्यामुळे जॉर्ज फ्लॉईड यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात संतापाची लाट उसळली होती.

या घटनेनंतर डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता. त्यानंतर आता न्यायालयाने डेरेक चॉविन याला सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला होता. ठिकठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम पाहायला मिळाला होता.

या खटल्यासाठी सात महिला आणि पाच पुरूष न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्यात आले होते. या खंडपीठाने तीन आठवड्यांच्या सुनावणीनंतर डेरेक चॉविन दोषी असल्याचा निकाल दिला. १२ सदस्यीय खंडपीठाने एकमताने डेरेक चॉविन दोषी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता डेरेक चॉविनला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने सूडाच्या राजकारणाचा कळस गाठला आहे

राज्यात आणीबाणी लावा- काँग्रेस आमदाराचेच मोदींना पत्र

श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

लसीकरण झाले मोफत

जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला तेव्हा घटनास्थळी अनेकजण उपस्थित होते. यापैकी काहीजणांनी न्यायालयात साक्ष दिली. मिनीपोलीस पोलीस दलाच्या प्रमुखांनीही डेरेक चॉविनविरोधात साक्ष दिली. डेरेकने जॉर्ज फ्लॉईड यांची मान बराच काळ गुडघ्याने दाबून ठेवली. हे पोलीस दलाच्या नियमांना धरून नसल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, इतर साक्षीदार न्यायालयात बोलताना भावूक झाले होते.

Exit mobile version