मोदी सरकारने जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेशातील मूळ हिंदूंसाठी महत्त्वाचे काम करून दाखवले आहे. बुधवारी केंद्र सरकारने काश्मिर खोऱ्यातून पूर्वी दहशतीमुळे पळून गेलेल्या हिंदूंच्या मालमत्ता त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
याबाबतीत विचारलेल्या प्रश्नाबद्दल दिलेल्या लेखी जबाबात सांगितले आहे. सरकारला काश्मिरी हिंदूंच्या मालमत्तेच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. सरकार ही मालमत्ता परत मिळवण्यासाठी काही पावले उचलत आहे का असा सवाल केला गेला होता. त्यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हो असे उत्तर दिले होते.
त्यानंतर राय यांनी सांगितले की नऊ मालमत्ता सरकारने पुन्हा एकदा ताब्यात घेतल्या आहेत. मंत्रीमहोदयांनी सांगितले की, मालमत्ता पुन्हा एकदा त्यांच्या मूळ मालकांना देण्याच्या संदर्भात जम्मू आणि काश्मिरच्या राज्यपालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नऊ मालमत्ता पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच स्थावर मालमत्तेसाठी केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकृत काळजीवाहक म्हणून नेमण्यात आले आहे, असे देखील मंत्री महोदयांनी सांगितले.
हे ही वाचा:
शक्तीमिल प्रकरणातला अल्पवयीन बनला गँगस्टर! वाचा थरारक कहाणी…
मोदी सरकारने आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
याबद्दल अतुल भातखळकर यांनी मोदी सरकारचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे की
मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्यामुळे तीन दशकांपूर्वी दाहशतवादामुळे मालमत्ता सोडून काश्मीर खोऱ्यातून परागंदा झालेल्या हिंदूंना त्यांच्या ९ मालमत्ता परत करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत ५२० हिंदू विस्थापित परतले आहेत. मोदी है तो मुमकिन है.
मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्यामुळे तीन दशकांपूर्वी दाहशतवादामुळे मालमत्ता सोडून काश्मीर खोऱ्यातून परागंदा झालेल्या हिंदूंना त्यांच्या ९ मालमत्ता परत करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत ५२० हिंदू विस्थापित परतले आहेत. मोदी है तो मुमकिन है. 🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/jIeGI4kQMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2021