भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील सर्वसाधारण जागेसाठी एका हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, बुनेर जिल्ह्यातील PK-25 च्या सर्वसाधारण जागेसाठी सवेरा प्रकाश नावाच्या हिंदू महिलेने अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
हिंदू समाजातील सवेरा प्रकाश ही महिला आपल्या वडिलांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. सवेरा प्रकाश यांच्या वडिलांचे नाव ओमप्रकाश असून ते निवृत्त डॉक्टर आहेत. ते यापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सदस्यही होते.
डॉनच्या अहवालानुसार, सोमवार, २५ डिसेंबर रोजी खैबर पख्तूनख्वाचे स्थानिक सलीम खान म्हणाले की, बुनेरमधून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या सवेरा प्रकाश या पहिल्या महिला आहेत. सवेरा प्रकाशने २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न होते. तिला सरकारी रुग्णालयातील खराब व्यवस्थापन आणि असहायता दूर करायची आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या अलीकडील सुधारणांमध्ये सर्वसाधारण जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांचा समावेश करणे बंधनकारक आहे.
हे ही वाचा:
हैदराबादचा क्रिकेटपटू झाला आयपीएस अधिकारी
इस्रायलने टिपला सिरीयात इराणचा अधिकारी
अंजू जॉर्ज म्हणते, तो काळ चुकीचा, मोदींच्या काळात खेळांची प्रगती!
अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांचा वाजणार शंख!
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महिलांच्या भल्यासाठी अनेक कामे केली आहेत. याशिवाय पर्यावरण स्वच्छतेकडे त्यांचे विशेष लक्ष असून निवडणुकीत यश मिळाल्यास त्यांना महिलांचा विकास आणि महिलांविरोधात होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी काम करायचे आहे.