पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील एका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका २३ वर्षीय महिलेवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूत्रपिंडाच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी फरार आहेत.
ही घटना सिंध प्रांतातील टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस रुग्णालयातील मूत्रपिंड वॉर्डमध्ये घडली. आरोपी डॉक्टरांनी या महिलेला मादक पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे या महिलेने म्हटले आहे. पीडितेच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मात्र तत्पूर्वीच डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातून पोबारा केला होता. त्यांना लवकरच पकडले जाईल, असा दावा पोलिस करत आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी ऑन ड्युटी; नऊ वर्षात एकही सुट्टी नाही
शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार
‘सनातन धर्म मिटवा’ म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला
सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री
घटनेनंतर पीडितेच्या नातेवाइकांनी आंदोलन केले. अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या महिला रुग्णालयातही सुरक्षित नाहीत, असा आरोप करत दोषींवर कठोरात कठोर शिक्षेची मागणी त्यांनी केली. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या विरोधात आवाज उठवणारे फराज परवेज यांनी या पीडितेचा व्हिडीओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. त्यात ही महिला तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन करताना दिसत आहे.
व्याभिचारी महिलेची झाडाला बांधून हत्या
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील व्याभिचाराचा आरोप असणाऱ्या एका महिलेवर दगडांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना शुक्रवारी राजनपूर जिल्ह्यात घडली. या २० वर्षीय महिलेवर तिच्या पतीने व्याभिचाराचा आरोप केला होता. आरोपी पतीने दोघा भावांच्या मदतीने या महिलेला झाडाला बांधले आणि तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर दगडांचा वर्षाव केला.