बांग्लादेशमधील नोआगाव या हिंदू गावावर जिहादींनी हल्ला केला आहे. हेफाज़त-ए-इस्लाम या कट्टरतावादी संघटनेने हा हल्ला केला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे बुधवारी हेफाज़त-ए-इस्लाम या संस्थेच्या हजारो जिहादी कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या संपूर्ण गावालाच लक्ष्य केले.
हेफाज़त-ए-इस्लाम या कट्टरतावादी संघटनेचा सचिव मौलाना मुफ्ती मुमूनुल याच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या भाषणात मौलाना, बंगबंधू म्हणजेच शेख मुजिबूर रेहमान यांच्या पुतळ्याचा विरोध करत आहे. या व्हिडिओच्या विरोधात नोआगाव गावातील एका हिंदू तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहिली. या पोस्ट मधून हेफाज़त-ए-इस्लाम या संघटनेच्या मौलानाचा निषेध करण्यात आला. ही पोस्ट वाचून मौलानाचा पारा चढला. त्याने आपल्या संघटनेतील तरुणांना संदेश पाठवून एकत्र केले. त्या सगळ्यांची माथी भडकवली. जिहादी मानसिकतेने प्रवृत्त झालेले हे कार्यकर्ते नोआगाव या हिंदू गावावर चाल करून गेले.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री
धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम
अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार
बुधवारी सकाळी सुमारे नऊच्या आसपास नोआगावच्या जवळपासच्या गावांमधून बघता बघता हजारो जिहादी तरुण मिळेल ती हत्यारे घेऊन नोआगावमध्ये दाखल झाले. त्यांनी गावातल्या दिसतील त्या हिंदू घरांवर आणि नागरिकांवर हल्ला करायला सुरुवात केली. ना त्यांनी बायका-मुलांना सोडले, ना अबाल वृद्धांना. दिसेल त्या घरात घूस आणि दिसेल त्याची लूट कर असे करत हेफाज़त-ए-इस्लामच्या जिहादींनी अनेक हिंदू घरांची लूट केली. इतके वर्षांचा थाटलेला संसार आपल्या डोळ्यासमोर उध्वस्त होताना हिंदू बघत होते. पण जीवाच्या भीतीने या शेकडो हिंदू कुटुंबांनी गाव सोडून पळ काढण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता.
या प्रकरणात आता बांग्लादेश पोलीस आणि बांग्लादेश सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.