पाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट

पाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिरात चोरट्यांनी लूट केली आहे. चोरट्यांनी तीन चांदीचे हार आणि रोख रक्कम लुटून नेली. याप्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. चोरटे आजूबाजूच्या परिसरातले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. सिंधमध्ये हिंदू समुदाय दिवाळीच्या तयारीत असताना मंदिर लुटले गेल्याने मंत्र्यांनी पोलिसांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सिंधमधील कोत्री भागातील देवी माता मंदिरातून तीन चांदीचे हार आणि हजारो रुपयांची चोरी झाली आहे. मात्र, दरोड्याच्या वेळी चोरट्यांनी मंदिरातील देवतांची विटंबना केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. सिंधचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री ग्यानचंद इसरानी यांनी तत्काळ पोलीस कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मंदिरांभोवती सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. दिवाळीपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका हिंदू मंदिरावरही जमावाने हल्ला केला होता. यावेळी मंदिराला आग लावून मूर्तींचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणात, धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भारताने या हल्ल्याचा निषेध केला होता. यापूर्वीही हिंदू धर्मस्थळांवर हल्ले झाले आहेत.

Exit mobile version