औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या समर्थानार्थ छत्रपती संभाजी नगर मध्ये ‘हिंदू जन गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. शहरातल्या क्रांती चौक येथून या मोर्चाला सुरवात झाली आहे. मुख्य म्हणजे पोलिसांनी या मोर्चा साठी परवानगी नाकारली असली तरी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. एमआयएमने छत्रपती संभाजी नगर नामांतराला विरोध करण्यासाठी गेले काही दिवस विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, लव्ह जिहाद, गोहत्या, आणि धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह देशांत सुद्धा लागू करण्यांत यावा अशी मागणी सुद्धा या मोर्चाच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, छत्रपती समभाजी नगर या नावाच्या समर्थनार्थ सकळ हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा आणि सभा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षांत घेऊन शहर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. आयोजकांना शनिवारी रात्रीच पोलीसांनी तसे कळवले होते. तरीसुद्धा आम्ही मोर्चावर ठाम असल्याचे सांगून आयोजकांनी आखलेला हा मोर्चा काढण्यात आला.
हे ही वाचा:
एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत
अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित
खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!
मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश
म्हणून क्रांती चौक परिसर ते सिल्लेखाना परिसरात ३३ पोलीस अधिकारी, सुमारे ३५० पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपायुक्तांसह सर्व तैनात करण्यात आले आहेत. क्रांती चौक परिसरातून हा मोर्चा निघून पुढे औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ मोर्चा विसर्जित केला जाणार आहे. आजच्या या छत्रपती संभाजी नगर मधील हिंदू जनगर्जना मोर्चावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे. मोर्चाच्या आडून राजकारण करून शहरात दंगली घडवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे.