28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनियाधर्मांतर आणि लव्ह जिहाद कायदा लवकर आणा

धर्मांतर आणि लव्ह जिहाद कायदा लवकर आणा

हिंदू जन आक्रोश मोर्चा ची मागणी

Google News Follow

Related

हिंदू समाजावर होणारा अन्याय आता सहन होत नाही, अशी मागणी हिंदू जनक्रोश मोर्चात करण्यात आली
पुण्यात संयुक्त हिंदू समाजाने मोर्चा काढून हिंदू समाज यापुढे अन्याय सहन करणार नाही, अशी घोषणा केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. याच अनुषंगाने आज २२ जानेवारीला सकाळी पुण्यात लाल महाल येथून सुरवात करून हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारका पर्यंत हिंदू जनक्रोश मोर्चा काढण्यात आला.

धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद यांसाठी कठोर कायदे करावेत आणि या कायद्यांची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जनजागरण आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हौतात्म्यदिन ‘धर्मवीर दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी ‘धर्मवीर दिन मोर्चा’ची स्थापना करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड

गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!

मोर्चात सहभागी हिंदूंनी भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामागे धर्मवीर असे लिहिले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन ‘धर्मवीर’ दिन म्हणून जाहीर करावा, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांवर हा मोर्चा काढण्यात आला होता.

हिंदू समाज यापुढे हे खपवून  घेणार नाही.पुण्यात काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नाव आहे ‘हिंदू जनक्रोश मोर्चा’. आज हिंदू समाज एकवटला असून , समाजात ज्या प्रकारे लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत त्यामुळे हिंदू मुलींवरील अत्याचाराविरुद्ध हा लढा आहे, असे मोर्चातील सहभागींनी सांगितले. ख्रिश्चन मिशनरी किंवा अरबांच्या पैशातून होत असलेल्या धर्मांतरांविरुद्ध हा संघर्ष आहे. या मोर्चात सहभागी लोकांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदू समाज भविष्यात कोणत्याही हिंदुविरोधी कारवाया सहन करणार नाही असे सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा