पाकिस्तानची स्थिती सध्या बिकट झाली असली तरी अल्पसंख्यांकावर अन्याय करण्याची खोड मात्र काही केल्या जात नाही. सोमवारी संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
पाकिस्तान सध्या चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळखोरीची अवस्था त्यांच्यावर ओढवली आहे. अशा परिस्थितीत अल्पसंख्य मुलींचे अपहरण, त्यांचे सक्तीने विवाह आणि धर्मांतरण हे प्रकार वाढीस लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी अहवालाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
अल्पवयीन मुलामुलींवर होत असलेल्या अत्याचारांकडे गांभीर्याने पाहायला हवे, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञानी तातडीने यासंदर्भात पावले उचलली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, १३ वयोगटातील मुलींना त्यांच्या घरातून अपहृत केले जात आहे. त्यांच्या घरापासून लांब त्यांची रवानगी केली जात आहे. त्यांच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या पुरुषांशी त्यांचे विवाह लावून दिले जात आहेत. आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. जागतिक मानवाधिकारांचे पूर्ण उल्लंघन येथे होत आहे.
UN experts express alarm at rise in abductions, forced marriages & conversions of underage girls and young women from religious minorities in Pakistan. Statement: pic.twitter.com/pAVLQAMWvm
— Sidhant Sibal (@sidhant) January 16, 2023
या तज्ज्ञांनी ही चिंता व्यक्त केली आहे की, अपहरण करणारे या मुलींकडून खोट्या कागदपत्रांवर सह्या घेतात आणि त्यांचे वय लग्नासाठी योग्य असल्याचे दाखवतात. धर्मांतर करण्यासाठीही त्यांनी स्वतःहून मंजुरी दिल्याचेही त्यातून दाखविण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे कोणताही गुन्हा झालेला नाही, असे पोलिसांना वाटते.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला घातल्या गोळ्या
मायाराम यांच्या मायेमागीलअदृश्य हात कोणाचा?
नड्डा म्हणाले नऊ राज्यात जिंकायचेच
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच एका १४ वर्षीय मुस्लिमेतर मुलीचा विवाह वयाने अधिक असलेल्या मुस्लिम व्यक्तीशी करण्यात आला. एका गावातून या मुलीला उचलून आणण्यात आले होते.
पाकिस्तानातील सिंध प्रांतातून अशा मुलींना जबरदस्तीने धर्मांतरित केले जाते आणि त्यांचे सक्तीने विवाह लावले जातात. मियाँ मिठ्ठू हा या प्रांतातील एक मौलाना आहे जो अशाप्रकारच्या कृत्यांत सहभागी आहे.