अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे

शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जावी त्यासाठीचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आला

अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे

अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच हिंदी भाषा शिकवली जाण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जावी त्यासाठीचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून या प्रस्तावास संमती मिळाल्यास लवकरच अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार आहे.

अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाची संघटना असलेल्या एशिया सोसायटी (AS) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (IAI) या संघटनेतील सुमारे १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी हिंदी भाषेचा शालेय शिक्षणात समावेश करावा याबाबत प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुढील वर्षी सप्टेंबरपासून अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यास सुरूवात होऊ शकते. यासाठी शिक्षकांची व्यवस्था करणे आणि अभ्यासक्रम तयार करणे अशा कामांमध्ये मदत करण्याचे आश्वासन एएस आणि आयएआय या दोन्ही संघटनांनी दिले आहे.

अमेरिकेतील सुमारे एक हजार शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याबाबत हा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे ८१६ कोटी रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख करण्यात आला आहे. जो बायडेन यांचा भारतासाठी असणारा सकारात्मक दृष्टीकोन आणि अमेरिकेत पुढील वर्षी होणारी अध्यक्षीय निवडणूक लक्षात घेता हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

आदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

इंग्रजीनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय

अमेरिकेत इंग्रजीनंतर दुसरी भाषा म्हणून मोठ्या प्रमाणात स्पॅनिश शिकवलं जातं. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाला तर स्पॅनिशच्या जोडीने हिंदीचाही पर्याय उपलब्ध होईल. अमेरिकेत माध्यमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी हिंदीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, या प्रस्तावानंतर आता प्राथमिक वर्गापासूनच हिंदीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सध्या अमेरिकेच्या न्यू जर्सी, टेक्सस, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये हिंदी शिकवणाऱ्या सुमारे १० शाळा आहेत. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश विद्यार्थी घेतले जातात.

Exit mobile version